मागील दोन वर्षापासून भारतीय क्रिकेट वर्तुळात जम्मू-कश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याचे नाव सातत्याने गाजत आयपीएलमध्ये आपल्या तुफानी गोलंदाजीने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 150 किमी प्रतितास करू शकतो. त्याने नुकतेच भारतीय संघात देखील पदार्पण केले आहे. त्याच्याकडे भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हणून पाहिले जात असतानाच, जम्मू-कश्मीरमधून आणखी एक तसाच वेगवान गोलंदाज समोर येताना दिसतोय. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर नुकताच एका वेगवान गोलंदाजाचा व्हिडिओ झाला आहे. वसीम बशीर असे या 22 वर्षीय गोलंदाजाचे नाव असून, तो जम्मू कश्मीरच्या 25 वर्षाखालील संघासाठी क्रिकेट खेळतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बशीर धारदार वेगवान चेंडूसह फलंदाजांची त्रेधातिरपीट उडवणारे बाउन्सर देखील टाकताना दिसतोय. अनेक माजी खेळाडूंनी त्याच्या या गोलंदाजीचे कौतुक केले आहे.
Next 150kmph from Kashmir!
Are there more Umran Maliks in J&K? Yes, this is Waseem Bashir, a 22-year-old pacer from Kashmir, who probably bowls over 145kmph (could even be 150kmph+)!
He is a part of the J&K U-25 team and has been scaring batters with pace! #IPL teams take note pic.twitter.com/0ijkDt21xh— Mohsin Kamal (@64MohsinKamal) November 17, 2022
बशीर हा जम्मू-कश्मीरमधील पेहलगाम येथील रहिवासी आहे. तो उमरान मलिकप्रमाणे 145 ते 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. कोलकाता नाईट रायडर्स संघाने मागील वर्षी आयपीएलसाठी त्याची चाचणी घेतली होती. त्याला त्याच्या वेगामुळे पहेलगाम एक्सप्रेस असे नाव देखील पडले आहे.
सुरुवातीला टेनिस बॉल क्रिकेट खेळताना त्याने चांगले नाव कमावले असून, तो अनंतनाग व बिजबेहार या ठिकाणी राहून आपले क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. त्याने यादरम्यान आपल्या शालेय व राज्य संघासाठी अंडर 19 क्रिकेट खेळलेय. क्रिकेट इतकीच शिक्षणाची ही आवड असल्याने त्याने बारावीनंतर दुरुस्त शिक्षण पद्धतीने पुढील शिक्षण पूर्ण केले आहे.
(Waseem Bashir New Speedstar From Jammu Kashmir After Umran malik)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधारपदाबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय; रोहित शर्मा वनडे आणि कसोटी संघाचा तर, हार्दिक पंड्या टी20चा कॅप्टन!
कर्मच! बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केल्यानंतर विराटच्या चाहत्यांचा टिवटिवाट