Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सिडनीमध्ये घडला इतिहास! स्टीव्ह स्मिथ ठरला सर्वात जलद चौदा हजार धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज

सिडनीमध्ये घडला इतिहास! स्टीव्ह स्मिथ ठरला सर्वात जलद चौदा हजार धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज

November 19, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Steve-Smith

Photo Courtesy: twitter/ICC


ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात शनिवारी (19 नोव्हेंबर) दुसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर मोठा इतिहास घडवला. स्मिथ सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 80 धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात शतकापासून केवळ 6 पाऊलेच दूर राहिला तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14000 धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा केवळ नववाच फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याने सर्वात जलद 14000 आतंरराष्ट्रीय धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला. गोलंदाजीने कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या स्मिथसाठी ही मोठीच उपलब्धी आहे.

स्मिथने मागील चार वनडे सामन्यात लागोपाठ चार अर्धशतके केली आहेत. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 94 चेंडूत 61 धावा केल्या होत्या. तसेच त्याच्या पुढच्या सामन्यात शतकी खेळी केली होती. तर सध्या सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने 2 सामन्यात दोन अर्धशतके केली आहेत.

स्मिथने 2010मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा नियमित सदस्य राहिला आहे. त्याने आतापर्यंत 87 कसोटीमध्ये 60च्या सरासरीने 8161 धावा केल्या आहेत. यामध्ये 28 शतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 63 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1008 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 63 आंतरराष्ट्रीय विकेट्सही घेतल्या.

Steve Smith's brilliant form in the 50-over format continues 👏

Watch the #AUSvENG ODI series LIVE on https://t.co/MHHfZPQi6H (in select regions) 📺

📝 Scorecard: https://t.co/C3d30LKtyI pic.twitter.com/K1rWgw5KNS

— ICC (@ICC) November 19, 2022

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्मिथने तिसऱ्या विकेटसाठी मार्नस लॅब्यूशेन सोबत 112 चेंडूत 101 धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्याने पाचव्या विकेटसाठी मिशेल मार्श याच्यासोबत 95 चेंडूत 90 धावांची भागीदारी केली. यावेळी तो 94 धावांवर असताना आदिल राशिद याच्या गोलंदाजीवर फिल सॉल्ट याला झेल देत बाद झाला. त्याने 114 चेंडूचा सामना करताना 5 चौकार आणि एक षटकार खेचला.

स्मिथच्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 8 विकेट्स गमावत 280 धावसंख्या उभारली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तोच वेग तीच दहशत! उमराननंतर कश्मिरमधून आला आणखी एक स्पीडस्टार; व्हिडिओ पाहून म्हणाल, “वाह”
सूर्या नाही, न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर ‘हा’ फलंदाज बेस्ट; अनुभवी फिरकीपटूने सांगितले नाव


Next Post
Sunrisers-Hyderabad

पैसाच पैसा! या दोन खेळाडूंसाठी सनरायझर्स खुली करणार आपली तिजोरी

Photo Courtesy: Twitter/ICC

संघ सहकारीच म्हणतोय, "रिषभला ओपनिंगच करायला द्यायला हवी"

MS Dhoni & Narayan Jagadeesan

चेन्नईने रिलीज केलेल्या खेळाडूने लावली शतकांची रांग, केली किंग कोहलीच्या 'या' विक्रमाची बरोबरी

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143