Wednesday, February 1, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पैसाच पैसा! या दोन खेळाडूंसाठी सनरायझर्स खुली करणार आपली तिजोरी

November 19, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Sunrisers-Hyderabad

Photo Courtesy: iplt20.com


आयपीएल 2023 स्पर्धेच्या तयारीला वेग आला आहे. आयपीएलच्या सर्व संघानी लिलावाआधी आपल्या करारबद्ध आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जमा केली आहे. त्यातच सनरायझर्स हैदराबाद संघानेही अनेक प्रमुख खेळाडूंना रिलीज करत आपल्याकडे मोठी रक्कम ठेवलीये. पुढील हंगामासाठी तगडा संघ तयार करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असते. त्यांच्याकडे सर्वाधिक रक्कम शिल्लक असल्याने ते कोणत्या दोन खेळाडूंवर सर्वाधिक बोली लावतील याबाबतचा अंदाज माजी क्रिकेटपटू व प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने व्यक्त केला आहे‌.

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2023 आधी आपला कर्णधार केन विलियम्सन, निकोलस पूरन, श्रेयस गोपाल व रोमारियो शेफर्ड यातून खेळाडूंना रिलीज केले. त्यामुळे आयपीएल लिलावात उतरताना त्यांच्याकडे सर्वाधिक 42.25 कोटी रुपये शिल्लक असतील. या रकमेत ते बड्या खेळाडूंना आपल्या संघात खेचण्याचा प्रयत्न करताना दिसतील.‌

प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने सनरायझर्स कोणत्या खेळाडूंना लक्ष करेल याबाबत बोलताना म्हटले,

“मी लिलावात मयंक अगरवाल याला सनरायझर्स हैदराबादकडे जाताना पाहत आहे. सोबतच ते मनीष पांडे याच्यावर देखील बोली लावू शकतात. इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स हा देखील मोठी रक्कम घेत सनरायझर्सचा भाग होण्याची शक्यता आहे. कारण, या संघाला गोलंदाजांची आवश्यकता नाही. ते त्यामुळे या सर्व प्रमुख फलंदाजांवर नजर ठेवून असतील.”

मयंकला पंजाबने तर पांडेला लखनऊ सुपरजायंट्सने करारमुक्त केले आहे. स्टोक्स मागील वर्षी आयपीएल लिलावात सहभागी झाला नव्हता.

सनरायझर्स हैदराबादने कायम राखलेले खेळाडू-
अब्दुल समद, एडेन मार्करम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जेन्सन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.

सनरायझर्स हैदराबादने करारमुक्त केलेले खेळाडू-
केन विल्यमसन, निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमारियो शेफर्ड, सौरभ दुबे, सीन एबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा आणि विष्णू विनोद.

(Sunrisers Hyderabad Might Be Big Bid For Stokes And Mayank)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधारपदाबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय; रोहित शर्मा वनडे आणि कसोटी संघाचा तर, हार्दिक पंड्या टी20चा कॅप्टन!
कर्मच! बीसीसीआयने निवड समिती बरखास्त केल्यानंतर विराटच्या चाहत्यांचा टिवटिवाट


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

संघ सहकारीच म्हणतोय, "रिषभला ओपनिंगच करायला द्यायला हवी"

MS Dhoni & Narayan Jagadeesan

चेन्नईने रिलीज केलेल्या खेळाडूने लावली शतकांची रांग, केली किंग कोहलीच्या 'या' विक्रमाची बरोबरी

Lasith-Malinga

आयपीएल कारकिर्दीतील शेवटच्या बॉलवर विकेट घेणारे 3 दिग्गज खेळाडू, यादीत 'तो' एकटाच भारतीय

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143