वॉशिंग्टन ओपन (सीटी ओपन) मध्ये स्कॉटलंडच्या अॅंडी मरेने रोमानियन टेनिसपटू मारीअस कोपीलला 6-7 (5/7), 6-3, 7-6 (7/4) असे पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मात्र या विजयासाठी त्याला तब्बल तीन तास लढावे लागले.
तेथील स्थानिक वेळेनुसार हा सामना पहाटे 3वाजून 1 मिनिटांनी संपला. यामुळे त्याने आयोजकांना खडसावले. त्याच्या सामन्याआधी खुप वेळ चाललेला सामना 2 वाजून 27 मिनिटांनी संपला होता.
No words, @andy_murray.
Just thanks for your emotions… 😍🙏#CitiOpen pic.twitter.com/w89E3sCzJg
— Tennis TV (@TennisTV) August 3, 2018
The comeback tour continues. @andy_murray with the emotional win against @MariusCopil
Murray advances to the QF and will face @alexdeminaur #CO50 pic.twitter.com/ZzfkkbFMnC
— Mubadala Citi DC Open (@mubadalacitidc) August 3, 2018
तीन ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या मरेचा हा 11 महिन्यानंतरचा पहिलाच सामना होता. दुखापतीतून सावरत मरे या स्पर्धेतील चार सामने खेळताना 8 तास 11 मिनिटे कोर्टवर होता.
2017च्या विम्बल्डन नंतर ही मरेची तिसरीच स्पर्धा आहे. हा सामना जिंकल्यावर तो खुप भावूक झाला. यानंतर थोडा वेळ तो बाकावर बसून परत रडला.
“हा खुप मोठा दिवस आणि सामना यामुळे मी थोडा फार भावूक झालो”, असे मरे म्हणाला.
“मी या आधीही असे जास्त वेळ चालणाऱ्या सामन्यात खेळलो आहे. पण सामना पहाटे संपणे हे खेळाडूसाठी, चाहत्यांसाठी तसेच कोणासाठी ही चांगले नाही”, असे ही तो पुढे म्हणाला.
मरे याचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स डी मिनॉर विरुद्ध आहे. हा सामना 4 ऑगस्टला होणार आहे. मिनॉरने आधीच्या सामन्यात 2017 एटीपी नेक्स्टच् चॅम्पियन हीयोन चंगला 6-2, 4-6, 6-2ने पराभूत केले आहे.
तसेच या सामन्यात कोपीलने मरेला चांगलीच कडवी झुंज दिली होती. जागतिक क्रमवारीत मरे 832व्या स्थानावर आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–चार वेळा टेनिस कोर्टवरच आपटली रॅकेट, झाला तब्बल ११ लाखांचा दंड
–कालच्या शतकापेक्षा त्या सामन्यातील शतक माझ्यासाठी खास- विराट कोहली