भारतीय संघात दमदार अष्टपैलूंचा भरणा आहे. त्यात रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. यातीलच एक नाव आहे वॉशिंग्टन सुंदर. सुंदर अलीकडे त्याच्या चेंडूसोबतच बॅटमधूनही संघासाठी धावांचा पाऊस पाडताना दिसत आहे. असाच पाऊस त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20त पाडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयी सुरुवात करण्यात अपयश आले, पण सुंदर त्याच्या कामगिरीमुळे चांगलाच चमकला. त्याने या सामन्यात कौतुकास्पद प्रदर्शनाने सर्वांची मने जिंकली.
सामन्याचा थोडक्यात आढावा
भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, न्यूझीलंड संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पंड्याचा निर्णय चुकीचा ठरवला. त्यांनी यावेळी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 176 धावा चोपल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 155 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताला या सामन्यात 21 धावांनी पराभव पत्करावा लागला. तसेच, न्यूझीलंडने या सामन्यात विजयी आघाडी घेतली.
वॉशिंग्टन सुंदरची जबरदस्त अर्धशतकी खेळी
भारताला दीडशे धावांचा आकडा पार करण्यात दोन फलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. त्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांच्या नावाचा समावेश आहे. सूर्यकुमारने 47 धावा (2 षटकार, 6 चौकार), तर सुंदरने 50 धावा (3 षटकार, 5 चौकार) केल्या. या अर्धशतकामुळे त्याने आतापर्यंत न केलेला कारनामा करून दाखवला.
FIFTY for @Sundarwashi5 🙌🙌
Maiden T20I half-century off 25 deliveries for Washington Sundar.
Live – https://t.co/9Nlw3mU634 #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/xtX8fZwOSk
— BCCI (@BCCI) January 27, 2023
वॉशिंग्टन सुंदर हा त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील 33वा सामना होता. त्याने या सामन्यापूर्वी 12 डावात फलंदाजी करताना फक्त 47 धावा केल्या होत्या. मात्र, त्याने जे 12 डावात जमले नाही, ते न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20तील एका डावात करून दाखवले. सुंदरने या सामन्यात 25 चेंडूत अर्धशतक झळकावले. हे त्याचे टी20तील पहिले अर्धशतक ठरले. त्याने यावेळी 28 चेंडू खेळताना 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 50 धावा कुटल्या. ही त्याची टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
गोलंदाजीतही केली धमाल कामगिरी
सुंदरने या सामन्यात फलंदाजीत चमकण्यापूर्वी गोलंदाजी करताना धमाल केली होती. त्याने भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 22 धावा देत 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. (Washington Sundar with bat in T20I)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रांची टी20 मध्ये न्यूझीलंडचा टीम इंडियाला दणका! सुंदरचा एकाकी संघर्ष अयशस्वी
U19 Womens T20 World Cup: इंग्लंडने 3 धावांनी उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, फायनलमध्ये भारताला भिडणार