न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाची कमान हार्दिक पंड्या याच्या हातात सोपवली गेली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना शुक्रवारी (27 जानेवारी) रांचीमध्ये खेळला जाणार आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याआधी कर्णधार हार्दिकने पत्रकार परिषदेत प्लेइंग इलेव्हनचे चित्र जवळपास स्पष्ट केले, जे पहिल्या टी-20 सामन्यात खेळतील.
भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडले गेले होते. पण दुखापतीच्या कारणास्तव ऋतुराज आता या मालिकेत खेळू शकणार नसल्याची माहिती हार्दिक पंड्या (hardik Pandya) याने दिली. असात ऋतुराजच्या चाहत्यांना त्याच्या पुनरागमनासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. हार्दिकने यावेळी असेही सांगितले की न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत शुबमन गिल (Shbaman Gill) खेळणार आहे. शुबमन गिलने नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत अप्रतिम खेळी केली होती, ज्यामुळे त्याला टी-20 मालिकेत देखील खेळण्याची संधी मिळणार आहे. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला या मालिकेसाठी संघात निवडले गेले असले, तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्यासाठी शॉला अजून काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचेही हार्दिकडून सांगण्यात आले.
हार्दिक पंड्याने बुधवारी (25 जानेवारी) पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी () याच्या घरी भेट दिली. यावर पत्रकार परिषदेत हार्दिकला प्रश्न विचारले गेले. हार्दिक म्हणाला की, मी धोनीमधील सर्व गुण शोषून घेतले आहेत आणि त्याच्याकडून जे काही शिकण्यासारखे होते ते शिकलो आहे. हार्दिकने पुढे असेही सांगितले की, धोनीसोबत आता क्रिकेटविषयी जास्त चर्चा होत नाही. त्या तुलनेत इतर गोष्टींवरील चर्चा अधिक होत असते.
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ: शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), वाशिंगटन सुंदर, दीपक हुड्डा, उमरान मलिक, शिवम मावी, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह.
न्यूजीलैंड संघ: फिन एलन, डेवोन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चापमैन, ग्लेन फिलिप्स, डेरिल मिशेल, माइकल ब्रेसवेल, मिशेल सैंटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्यूसन, जॅकब डफी, हेनरी शिपले, ब्लेयर टिकनर. (Prithvi Shaw will not be part of the playing XI for the first T20I against New Zealand in Ranchi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात कशी असेल खेळपट्टी, जाणून घ्या रांचीतील आकडेवारी
VIDEO | राहुलपाठोपाठ अक्षर पटेलही अडकला लग्नबंधनात, धुमधडाक्यात निघाली अष्टपैलूची वरात