इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) लॉर्ड्सवर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी वॉशिंगटन सुंदरने (Washington Sundar) टीम इंडियासाठी (Team india) अतिशय शानदार खेळी केली. जिथे जसप्रीत बुमराहसह (Jasprit Bumrah) इतर वेगवान गोलंदाज प्रयत्न करूनही जो रूट (40 धावा) याला बाद करू शकले नाहीत, तिथे वॉशिंगटनने अवघ्या अर्ध्या तासात इंग्लंडला दोन मोठे धक्के दिले, ज्यामुळे इंग्लंड पूर्णपणे दबावात आला.
हे श्रेय पूर्णपणे वॉशिंगटन सुंदरलाच जातं, कारण त्याने जे दोन फलंदाज बाद केले ते म्हणजे अनुभवी जो रूट (Jo Root) आणि आक्रमक फलंदाजी करणारा यष्टीरक्षक जेमी स्मिथ(Jemi Smith) तसेच विशेष म्हणजे वॉशिंगटनने दोघांनाही बोल्ड केले. तेव्हा माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला ‘खूपच सुंदर’.
जेव्हा गोलंदाजीची लांबी योग्य असते आणि दिशा अचूक असते, तेव्हा फलंदाज गोंधळतो की पुढे खेळावं की मागे
जेमी स्मिथसोबत असंच काहीसं घडलं. मनोज तिवारीचं म्हणणं अगदी योग्य आहे, वॉशिंगटनने लॉर्ड्सवर अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केली.
जर सामना भारताच्या बाजूने गेला, तर वॉशिंगटनचं योगदान अनेक वर्षं लक्षात राहील. कारण त्याने अशा वेळी विकेट्स घेतल्या, जेव्हा कर्णधार शुबमन गिलला त्याची सर्वात जास्त गरज होती आणि तेही अगदी योग्य वेळी. आता टीम इंडियासमोर अवघ्या 193 धावांच आव्हान आहे.






