---Advertisement---

ASIA CUP: पाकिस्तानला हरवण्याचे षडयंत्र रचण्यात वसीम अकरमचा हात, पाहा संपूर्ण व्हिडिओ

On: शनिवार, सप्टेंबर 10, 2022 5:59 PM
Wasim-Akram-Sri-Lanka-Bowler
---Advertisement---

आशिया कप 2022चा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. आशिया कप 2022च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका संघ आमने-सामने येणार आहेत. तत्पूर्वी, आशिया चषक 2022 सुपर-4 फेरीतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे श्रीलंकेने सुपर-4 फेरीतील तिन्ही सामने जिंकले. त्याचवेळी या सामन्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रम श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंकाला गोलंदाजीच्या टिप्स देताना दिसत आहे.

वसीम अक्रमने दिलशान मदुशंकाला ‘बॉलिंग टिप्स’ दिल्या
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमसोबत श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ श्रीलंका क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला आहे. वास्तविक श्रीलंका क्रिकेट संघाचे प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांनी वसीम अक्रम यांना पाकिस्तान-श्रीलंका सामन्यानंतर थोडा वेळ देण्याची विनंती केली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूने श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंकासोबत सुमारे 30 मिनिटे घालवली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ले गयी दिल मेरा मनचली’ गाण्यावर धवल कुलकर्णीचं भन्नाट ड्रम वादन, पाहा व्हिडीओ
राणी एलिझाबेथशी हस्तांदोलन करणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचे पवार घराण्याशी जवळचे नाते; खासदार सुळेंनी शेअर केला फोटो

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---