चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 समाप्त झालेली आहे. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला 4 विकेट्स ने पराभूत केले आहे. अंतिम टप्प्यात रोहित शर्मा वप्लेअर ऑफ द मॅच’, त्याचबरोबर रचिन रवींद्रने ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ या पदवीने सन्मानित झाले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी समाप्त झाल्यानंतर पाकिस्तानचे महान माजी खेळाडू वसीम अक्रम यांनी त्यांना आवडलेल्या खेळाडूबद्ल भाष्य केले आहे.
वसीम अक्रम यांनी रचिन रवींद्र बद्दल असे वक्तव्य केले आहे की, “न्यूझीलंडच्या संघाच्या क्रिकेटने कमाल केली आहे. छोटा देश असून सुद्धा त्यांच्या संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. रचिनने अंतिम सामन्यात जी फाइटिंग स्पिरिट दाखविली आहे, त्यामुळे मी प्रचंड प्रभावित झालो आहे. मैदानात त्याला पाहून असे वाटते की न्यूझीलंड संघ शेवटपर्यंत लढत आहे.”
वसीम अक्रम पुढे म्हणाले की, “जर रचिनने अंतिम सामन्यात आणखी 10 ओव्हर खेळला असता तर भारतीय संघाला जिंकण्याची संधी भेटली नसती. भारतीय संघाची अवस्था वाईट झाली असती.
भारतीय संघ विजयी झाल्यानंतर त्यांना 19.49 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. त्याचबरोबर उपविजेत्या संघाला 9.745 कोटी देण्यात आले. सेमीफायनल मधून बाहेर झालेल्या संघांना 4.87 कोटी एवढी रक्कम देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :
ऋषभ पंतचा हटके अंदाज – बहिणीच्या हळदी-मेहंदी सोहळ्यात रंगतदार एंट्री
कोणीही रोहित-विराटला निवृत्त करू शकत नाही! महान भारतीय खेळाडूचे मत
कसोटी क्रिकेटचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव – विशेष सामन्यासाठी रंगणार मैदान!