संयुक्त अरब अमिरातीत चालू असलेला आयपीएलचा १३वा हंगाम संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. तिथे भारत-ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे व टी२० मालिका होणार आहे. त्यानंतर ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. आता पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम याने या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेतील विजयाचा प्रबळ दावेदार असणाऱ्या संघाचे नाव सांगितले आहे.
कोणता संघ आहे विजयाचा प्रबळ दावेदार?
वाहिद खानच्या ‘क्रिकेट बाज’ यूट्यूब चॅनलवर बोलताना अक्रम म्हणाला की, “माझ्या मते ऑस्ट्रेलिया संघाची वेगवान गोलंदाजी क्रिकेटजगतात सर्वश्रेष्ट आहे. त्यांच्याकडे पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेजलवुड असे बरेच उच्च श्रेणीचे गोलंदाज आहेत. तसेच भारतीय संघाकडे जसप्रीत बुमराहसारखा घातक गोलंदाज उपलब्ध आहे. सोबतच मोहम्मद शमी, नवदीप सैनीही चांगली गोलंदाजी करतात. त्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया संघातील सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळेल. पण ऑस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेच्या विजयाचा प्रबळ दावेदार राहील असे मला वाटते.”
भारतीय संघात झालेत बदल
“भारतीय क्रिकेटपटू जेव्हा मैदानावर उतरतात, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास पाहण्याजोगा असतो. त्यांच्या शारीरिक हावभावात प्रचंड बदल झाले आहेत. ९०च्या दशकातील मजबूत पाकिस्तान संघाप्रमाणे त्यांच्यात आत्मविश्वास निर्णाम झाला आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीवर खूप विश्वास आहे. त्यामुळे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, भारतीय संघ थोडासा खोडकर झाला आहे,” असे पुढे बोलताना अक्रम म्हणाला.
आयपीएलनंतर भारतीय संघ जाणारा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
मंगळवारी म्हणजेच १० नोव्हेंबरला आयपीएल २०२०चा अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. तिथे २७ नोव्हेंबरपासून ते १९ जानेवारीपर्यंत दोन्ही संघात वनडे, टी२० आणि कसोटी मालिका होईल. यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. मार्च २०२०नंतर हा भारतीय संघाचा पहिलाच दौरा असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
OMG! महिला बिग बॅश लीगमधील ‘हा’ झेल तुम्ही पाहिलाय का? एकदा पाहाच
प्रसिद्ध समालोचकाचे होणार पुनरागमन; BCCI ने IPL कॉमेंट्री पॅनलमधून केलं होतं बाहेर
बाप-लेकाचा गोंडस क्षण! आपल्या चिमुकल्यासोबत खेळण्यात हार्दिक पंड्या दंग; पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा