आयपीएल 2023 मध्ये एमएस धोनी याच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स शानदार कामगिरी करताना दिसत आहे. सातत्यपूर्ण कामगिरीसह चेन्नईने गुणतालिकेतील पहिल्या चारमधील आपले स्थान भक्कम ठेवले असून, त्यांना विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. असे असताना कर्णधार धोनी याचा हा अखेरचा हंगाम असल्याचे देखील दिसून येते. चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेल्या धोनीनंतर या संघाचे नेतृत्व कोणी करावे, याबाबत पाकिस्तानचे माजी कर्णधार वसिम अक्रम यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये पाच विजय मिळवले असून ते चौथ्या क्रमांकावर उभे आहेत. मागील हंगामातील खराब कामगिरीनंतर यावेळी पुन्हा चेन्नई विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईला चार आयपीएल विजेतेपद जिंकून देणारा धोनी या हंगामानंतर निवृत्त होऊ शकतो. धोनी 41 वर्षांचा झाला असून त्याने आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढील हंगामात चेन्नईचे नेतृत्व अजिंक्य रहाणे याने करावे असे अक्रम म्हणाले.
“अजिंक्य रहाणेकडे मोठा अनुभव आहे. भारतीय खेळाडू असल्याने तो सातत्याने संघात असेल. त्याने यापूर्वी देखील नेतृत्व केले आहे त्यामुळे तो इतका दबाव घेऊ शकणार नाही. मागील वर्षी जडेजा याला कर्णधार बनवल्याने त्याच्यावर अतिरिक्त जबाबदारी आली होती. त्यामुळे त्याची आणि संघाची कामगिरी योग्य झाली नाही.”
रहाणे याला यावर्षी चेन्नईने त्याच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. रहाणेने सर्वांच्या अपेक्षेच्या उलट कामगिरी करत अतिशय आक्रमक खेळ दाखवला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघातही निवड झाली आहे.
(Wasim Akram Said Ajinkya Rahane Will Lead CSK Next Season As MS Dhoni Replacment)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान सुधरणार नाही! लाईव्ह सामन्यात घडली मोठी चूक, अंपायर्सनी लगेच थांबवली मॅच; पाहा व्हिडिओ
मोहम्मद शमीने मोडलं KKRचं कंबरडं, IPL 2023मध्ये केली अनोखी ‘शंभरी’, सिराजनंतर बनला दुसराच गोलंदाज