---Advertisement---

“टीम डायरेक्टर इंग्लंडमध्ये बसलाय आणि इथे…” अक्रमचा पाकिस्तान संघाला घरचा आहेर

On: गुरूवार, सप्टेंबर 14, 2023 4:26 PM
---Advertisement---

सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेत सहभागी झाला. साखळी फेरीत शानदार कामगिरी केल्यानंतर सुपर फोरमध्ये त्यांनी विजयासह सुरुवात केली. मात्र, भारतीय संघाकडून त्यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. श्रीलंके विरुद्धच्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. असे असतानाच पाकिस्तानचे माजी कर्णधार व दिग्गज वेगवान गोलंदाज वसिम अक्रम यांनी मोठे विधान केले आहे.

आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान संभाव्य विजेता म्हणून सहभागी झाला आहे. साखळी फेरीत नेपाळला एकतर्फी पराभूत केल्यानंतर भारताविरुद्धच्या सामन्यात देखील त्यांनी पकड बनवली होती. मात्र, त्यानंतर सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सुपर फोर फेरीत प्रवेश केल्यानंतर बांगलादेशला त्यांनी पहिल्या फेरीत पराभूत केले. त्यानंतर भारताविरुद्ध मात्र त्यांना लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी करो अथवा मरो अशा स्थितीचा असेल. या सामन्यात विजय मिळवल्यास ते अंतिम फेरीत प्रवेश करतील. श्रीलंकेने हा सामना जिंकला अथवा पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर, श्रीलंका भारतीय संघासोबत अंतिम सामना खेळेल. या सर्व पार्श्वभूमीवर प्रसारण वाहिनीशी बोलताना पाकिस्तानचे माजी कर्णधार अक्रम म्हणाले,

“पाकिस्तान क्रिकेट संघाचे संचालक इंग्लंडमध्ये बसून डर्बीशायर काऊंटी संघाबाबत ट्विट करत आहेत. त्यांना आता आशिया कपसाठी येथे असायला हवे होते.”

पाकिस्तान क्रिकेट बॉर्डाने मिकी आर्थर यांना एप्रिल महिन्यात ही जबाबदारी दिली होती. मात्र, त्याचबरोबर ते डर्बीशायर संघाचे मुख्य प्रशिक्षक देखील आहेत. त्यामुळे अक्रम यांनी अशाप्रकारे त्यांच्यावर टीका केली.

(Wasim Akram Slams PCB And Team Director Micky Arthur)

हेही वाचा-
पृथ्वी शॉबाबत धक्कादायक ब्रेकिंग! कोसळलाय संकटांचा डोंगर, लगेच वाचा
ना रोहित ना स्मिथ: वर्ल्डकपमध्ये फक्त दोन चेहरे असे, ज्यांनी केल्यात हजार धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---