सध्या पाकिस्तान क्रिकेटचा सर्वात वाईट काळ सुरू आहे. टी -२० विश्वचषक स्पर्धा तोंडावर असताना, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने सुरक्षेच्या कारणास्तव सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी संपूर्ण मालिका रद्द करण्याच्या निर्णय घेतला होता. या धक्क्यानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने देखील दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
येत्या ऑक्टोबर महिन्यात इंग्लंडचा महिला आणि पुरुष संघ पाकिस्तानमध्ये मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी रवाना होणारा होता. परंतु अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक पाकिस्तानी दिग्गजांनी त्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वसीम अक्रम यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे.
चाहत्यांना समर्थन करण्याची केली मागणी
माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम आक्रमक यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डसोबत चर्चा करताना म्हटले की, “मला माहित आहे की तुम्ही सर्व न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या निर्णयामुळे खूप निराश आहात. जेव्हा त्यांनी त्यांचे दौरे रद्द केले, विशेषत: न्यूझीलंड, ज्यांनी शेवटच्या क्षणी त्यांचा दौरा रद्द केला. मी तुमच्यासारखाच निराश आणि तितकाच दुःखी आहे. पण आयुष्य पुढे गेले पाहिजे. जसे आपले अध्यक्ष रमीज राजा यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानला टी – २० विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांनी जो संघ निवडला आहे त्यांना समर्थन करा.”
चांगली कामगिरी करून सर्वांनाच जोरदार प्रत्युत्तर देऊ
तसेच ते पुढे म्हणाले की, “नंतर गरज पडल्यास आपण त्यांच्यावर टीका करू आणि उपायही काढू. परंतु आता सर्वांनी एकत्र येऊन त्यांना समर्थन करण्याची गरज आहे. जर संघांना इथे यायचं नसेल तर नका येऊ देऊ. परंतु पाकिस्तान संघाने जर या स्पर्धेत चांगली कामगिरी केली तर जगभरातील संघ पाकिस्तानसोबत खेळण्यासाठी धावत येतील. यामुळेच आपण सर्वांनी त्यांना समर्थन केले पाहिजे.”
टी -२० विश्वचषक स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. तसेच २४ ऑक्टोबरला पाकिस्तान संघाची पहिलीच लढत भारतीय संघाविरुद्ध पार पडणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही देशातील चाहते उत्सुक आहेत. तसेच पाकिस्तान संघ आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाला पराभूत करून बदला घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईकडून पराभूत होऊनही पंजाबच्या खेळाडूंचे भरले खिसे, मिळाली ‘इतक्या’ लाखांची बक्षिसे
‘शमीची कृपा, त्याच्यामुळेच मी फॉर्मात परतलो’, हार्दिकने प्रतिस्पर्धी खेळाडूला दिले श्रेय
बीसीसीआयने आयपीएल २०२१च्या वेळापत्रकात बदल करण्यामागे आहे ‘रहाणे कनेक्शन’?, घ्या जाणून