पाकिस्तानचे माजी कर्णधार वसिम अक्रम यांनी खुलासा केला आहे की, वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज विवियन रिचर्ड्स हे एकदा अक्रमला मारणार होते. भारताचे माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोपडा यांच्याशी इंस्टाग्रामवर बोलताना अक्रमने या गोष्टीचा खुलासा केला.Wasim akram tells about his incedent with vivian richards on instagram live with aakash chopra.
याविषयी बोलताना अक्रम म्हणाले, “रिचर्ड्स मला मारण्यासाठी ड्रेसिंग रुमच्या बाहेर बालकनीत आले होते. त्यामुळे त्यांच्या मारापासून वाचण्यासाठी मी त्यांचे पाय पकडले आणि त्यांनी मला माफ केले होते. ही घटना १९८८साली बोर्बाडोस येथे घडली होती. त्यावेळी पाकिस्तान संघ वेस्ट इंडिज कसोटी दौऱ्यावर गेला होता.’
अक्रम पुढे बोलताना म्हणाले, “तत्कालिन संघाचेे कर्णधार इम्रान खान आम्हाला सांगत असायचे की या फलंदाजाना बाउंसरवर खेळवा. त्यांना जास्तीत जास्त फ्रंट फुटवर खेळवा. त्यावेळी रिचर्ड्स हे शरीरीने मजबूत होते. तर मी त्यांच्यासमोर खूप बारिक होतो. तरी, ते माझ्या गोलंदाजीला घाबरत असायचे.”
“खेळताना मी एक चेंडू बाउंसर टाकला आणि रिचर्ड्स यांच्या डोक्यावरची टोपी खाली पडली. त्यामुळे ते खूप चिडले होते. ते मला इंग्रजीत काही तरी म्हणाले होते. पण मला ते व्यवस्थित समजले नव्हते. म्हणून मी इम्रानकडे गेलो आणि त्याला म्हणालो होतो की, विव मला काहीतरी म्हणत आहे. कदाचित तो मला मारणार आहे वाटतं. यावर इम्रान मला म्हणाला की, तू तुझी कामगिरी करत रहा. काळजी करू नकोस. मी आहे ना.”
अक्रम पुढे म्हणाले की, “इम्रानच्या म्हणण्यामुळे मी परत विवला बाउंसर टाकला आणि त्याने त्यावर चौकार मारला. पण, अखेर दिवसाच्या शेवटी मी त्याला बाद केले आणि त्याच्यासमोर जाऊन खूप जल्लोष साजरा केला. त्यानंतर सगळे आपापल्या ड्रेसिंग रुममध्ये गेले. मीही माझ्या ड्रेसिंग रुममध्ये होतो आणि तेवढ्यात कुणी तरी येऊन मला सांगितले की, विव तुझी वाट पाहत आहे. मी बाहेर जाऊन पाहिले तर विव शर्ट न घालता बाहेर उभे होते. त्याचे पूर्ण अंग घामाने ओले झाले होते.”
“हे बघून मी लगेच इम्रानकडे गेलो आणि त्याला सांगितले. तर तो म्हणाला की, तुझे तू बघून घे. त्यामुळे मी बाहेर जाताच रिचर्ड्सचे पाय पकडले आणि त्याची क्षमा मागितली. तरी, रिचर्ड्स मला म्हणाले होते की, मी आता तुला मारुन टाकतो,” असे अक्रम यांनी सांगितले.
शेवटी बोलताना अक्रम यांनी ९०च्या दशकात त्यांना सर्वाधिक सतावणाऱ्या फलंदाजाचे नाव सांगितले. ते फलंदाज न्यूझीलंडचे मार्टिन क्रो हे होते. त्यांनी १९९३ला पाकिस्तानविरुद्ध २ शतके ठोकली होती.
ट्रेंडिंग घडोमोडी-
श्रीशांत म्हणतो, हे २ खेळाडू सोडले तर सगळेच भारतीय खेळाडू करतात दुर्लक्ष
पुरुष क्रिकेटर्सने भरलेल्या बसमध्येच महिला क्रिकेटपटूने नाईलाजाने केली…
कोहलीला सतत तंबूचा रस्ता दाखवणारे जगातील ५ गोलंदाज