वासिम जाफर हा भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 14 हजार पेक्षा जास्त धावा करत त्याने विक्रम नोंदवला आहे. मात्र सध्या तो एका विशिष्ट कारणामुळे चर्चेचा विषय बनला आहे.
वासिम जाफर सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतो. ट्विटरच्या माध्यमातून तो आपली मतं मांडतो. पण तो त्याच्या प्रतिक्रिया मिम्सद्वारे शेअर करतो. त्यामुळे सध्या मजेदार मिम्स शेअर करून टिप्पणी करण्याची त्याची पद्धत चाहत्यांना फार आवडत आहे. नुकताच त्याने ट्विटरवर एक मीम शेअर केले आहे, ज्यामध्ये त्याने भारताचा फिरकीपटू आर अश्विनला टॅग केले आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फो या क्रीडा वेबसाईटने शनिवारी (21 नोव्हेंबर) ट्विटर च्या माध्यमातून सर्व चाहत्यांना प्रश्न विचारला. त्यांनी विचारले की, “कोणत्याही खेळाडूचे व संघाचे नाव न घेता सांगा की तुम्हाला सर्वाधिक आवडलेला सामना कोणता?”
जाफरने या प्रश्नाचे मजेदार पद्धतीने उत्तर दिले. यादरम्यान त्याने बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ‘लगान’ या प्रसिद्ध चित्रपटाचा फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये विदेशी गोलंदाज ‘मंकडींग’ पद्धतीने भारतीय खेळाडूला बाद करत होता. या फोटोत जाफरने आर अश्विनला टॅग केले आहे.
https://twitter.com/WasimJaffer14/status/1330109002651414535?s=20
विशेष म्हणजे आर अश्विननेही जाफरच्या ट्विटवर उत्तर देत ‘वसिम भाई’ अशी कमेंट केली आहे. तसेच पुढे हसण्याचा इमोजी टाकला आहे.
https://twitter.com/ashwinravi99/status/1330117303892140040
आर अश्विन नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला. या हंगामादरम्यान आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तो गोलंदाजी करत असताना नॉनस्ट्राईकर एन्डवर उभा असलेला फलंदाज ऍरॉन फिंच चेंडू फेकायच्या आधीच क्रीझमधून बाहेर आला. त्यामुळे अश्विनने मांकडींग पद्धतीने बाद करण्याचा त्याला इशारा दिला होता.
यानंतर अश्विनने ट्विट करत म्हटलं होतं की हा शेवटचा इशारा आहे आणि जर कुणी यापुढे पुन्हा असं केलं, तर तो फलंदाजाला बाद करण्याची संधी सोडणार नाही.
अश्विनने गेल्या वर्षी इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरला मांकडींग पद्धतीने बाद केले होते. त्यानंतर तो वादात सापडला होता आणि त्याला अनेक दिग्गज खेळाडूंच्या टीकेचा सामनाही करावा लागला होता.
जाफरचे मिम्स होतायेत व्हायरल
वासिम जाफरने मिम्स शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही, जाफरने याआधीही मिम्सच्या माध्यमातून बऱ्याच वेळा प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचे मिम्स व्हायरलही होत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगने रोहित शर्मावर केलेल्या टीकेला जाफरने मीम शेअर करून उत्तर दिले होते. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या एका ट्विटलाही त्याने मीम शेअर करत प्रतिक्रिया दिली होती.
वासिम जाफरने 186 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 53.70 च्या सरासरीने 14609 धावा केल्या आहेत.301 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय संघात स्थान न मिळाल्यामुळे निराश झालेला सूर्यकुमार रोहितला म्हणाला…
‘भारतात परतण्यापूर्वी विराट करणार काहीतरी खास’, ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज खेळाडूचे भाकीत