---Advertisement---

इंग्लंडच्या पराभवानंतर पुन्हा एकदा जाफरने केले इंग्लंडला ट्रोल! व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट

On: बुधवार, ऑक्टोबर 26, 2022 8:29 PM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022 मध्ये बुधवारी (26 ऑक्टोबर) एक मोठा उलटफेर बघण्यास मिळाला. विश्वचषक विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या इंग्लंडला आयर्लंडविरूद्ध डकवर्थ लुईस नियमानुसार 5 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर (Wasim Jaffer) याने इंग्लंड संघाची खिल्ली उडवणारे एक मजेशीर ट्विट केले जे सध्या खूपच चर्चेत आहे.

आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये आयर्लंड क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा मोठा उलटफेर केला आहे. पात्रता फेरीत वेस्ट इंडीजवर 9 गडी राखून मात करत सुपर 12 मध्ये पोहचलेल्या आयर्लंडने अ गटात इंग्लंडला 5 धावांनी पराभूत केले. यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. वेस्ट इंडीजला सुपर 12 च्या शर्यतीतून बाहेर काढणाऱ्या आयर्लंडला मुख्य फेरीच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेच्या हातून पराभव स्वीकारावा लागला होता.

 

इंग्लंडच्या या पराभवाची खिल्ली उडवत भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफर (Wasim Jaffer) याने एक ट्वीट शेअर केले आहे. जाफरने या ट्वीटच्या माध्यमातून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन ( Michael Vaughan) याला चांगलचं ट्रोल केले. याआधी देखील वॉन आणि जाफर यांच्यात ट्विटर वॉर पाहायला मिळाले आहे. या नव्या ट्विटचा व्हिडिओ पाहून कोणालाही हसू आवरणार नाही.

तसेच मायकल वॉनने या पराभवानंतर ट्वीटर वर लिहिलय की,” इंग्लंडने आज चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं नाही. आयर्लंडने गोलंदाजीत चांगलं प्रदर्शन केले” आयर्लंडविरूद्ध हरल्यानंतर इंग्लंड गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असून, आयर्लंड चौथ्या स्थानावर पोहचला. न्यूझीलंड पहिल्या स्थानी आणि श्रीलंका दुसऱ्या स्थानी विराजमान असून, तसेच ऑस्ट्रेलियन संघ पाचव्या आणि अफगाणिस्तान सहाव्या स्थानावर आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इतिहास कायम राहिला! विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध इंग्लंड नेहमीच होते टाय-टाय फिस्स
टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानाकडे विराटची आगेकूच, सूर्या-बाबरला मागे टाकत नवा खेळाडू दुसऱ्या क्रमांकावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---