नागपूर | येथील विदर्भ क्रिकेट असोशियशनच्या मैदानावर आज विदर्भाने शेष भारताविरूद्ध दुसऱ्या दिवशी ३ बाद ५९८ धावांचा डोंगर उभा केला आहे. यात वसिम जाफरच्या नाबाद द्विशतकी खेळीचा समावेश आहे.
काल विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
या सामन्यात वसीम जाफरने आज ४२५ चेंडूत नाबाद २८५ धावा करताना अनेक विक्रम केले. ते असे
-इराणी कपमध्ये एका डावात सर्वाधिक धावा (नाबाद २८५) करण्याचा विक्रम आता वसीम जाफरच्या नावावर. यापुर्वी हा विक्रम मुरली विजयच्या (२६६ धावा) नावावर होता.
-वसीम जाफर हा पहीला भारतीय आहे ज्याने वयाच्या ४०शी नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात २५० पेक्षा अधिक धावा (नाबाद २८५) केल्या आहेत.
-वसीम जाफर हा पाचवा भारतीय आहे ज्याने वयाच्या ४०शी नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात २०० पेक्षा अधिक धावा (नाबाद २८५) केल्या आहेत.
-इराणी कपमध्ये वसीम जाफर – जी सतीश जोडीने चौथी विक्रमी भागीदारी (२८९ धावा) केली.
-इराणी कपमध्ये वसीम जाफर शेष भारताविरूद्ध सर्वाधिक धावा (नाबाद २८५) करणारा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी सुरींदर अमरनाथ यांनी दिल्लीकडून शेष भारताविरूद्ध नाबाद २३५ धावा केल्या होत्या.
-प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विदर्भाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडूचा (नाबाद २८५) विक्रम आता जाफरच्या नावावर झाला आहे. यापुर्वी हा विक्रम समीर गुजर यांच्या नावावर होता. त्यांनी १९९१-९२मध्ये मध्यप्रदेश विरूद्द २२१ धावा केल्या होत्या.
-आज वसीम जाफर १७४ धावांवर पोहचला तेव्हा त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १८ हजार धावांचा टप्पा पार केला. जाफरने ही कामगिरी २४२ प्रथम श्रेणी सामन्यात केली असुन ३९७ डावात फलंदाजी करताना त्याने ५०.२८च्या सरासरीने १८००६ धावा केल्या आहेत. त्यात ५३ शतके आणि ८६ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३१४ ही जाफरची सर्वौच्च खेळी आहे.
-१८ हजार धावांचा टप्पा पार केलेला वसीम जाफर ६वा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापुर्वी सुनील गावसकर (२५८३४), सचिन तेंडूलकर (२५३९६), राहूल द्रविड (२३७९४), व्हीव्हीएस लक्ष्मण (१९७३०) आणि विजय हजारे (१८७४०) यांंनी अशी कामगिरी केली आहे.