बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला सामना 17 मार्च रोजी मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर याने या पहिल्या वनडेसाठी संभावित प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे. विशेष म्हणजे जाफरने या अंतिम 11 खेळाडूंमध्ये एका युवा आणि संघासाठी फायदेशीर ठरू शकणाऱ्या गोलंदाजाला संधी दिली नाहीये.
वसीम जाफर (Wasim Jaffer) भारतीय संघाचा माजी दिग्गज असून सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. मागच्या काही वर्षांमध्ये जाफरचा ऑनलाईन चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नेहमी क्रीडा जगताततील वेगवेगळ्या विषयांवर मजेशीर पद्धतीने व्यक्त होणे, ही जाफरची खासियत म्हणता येऊ शकते. यावेळी जाफरने सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी (IND vs AUS 1st ODI) भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे. यामध्ये जम्मू कश्मीर एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा उमरान मलिक (Umran Malik) याला संधी न दिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
जाफरने या संघात सलामीवीर म्हणून शुबमन गिल आणि युवा यष्टीरक्षक ईशान किशन याला संधी दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर केएळ राहुल, तर पाचव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या यांना निवडले गेले आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. गोलंदाजी आक्रमणात वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना निवडले गेले आहे.
My India XI for first ODI:
Gill
Ishan (WK)
VK
Surya
KL
Hardik (C)
Jadeja
Washi
Kuldeep
Shami
SirajWhat's yours? #INDvAUS
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 16, 2023
दरम्यान, भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी उपलब्ध नसेल. अशात हार्दिक पंड्या पहिल्या वनडे कर्णधारपद सांभाळताना दिसेल. मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी मात्र रोहित संघाचे नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स देकील या वनडे मालिकेत खेळणार नाहीये. मागच्या आठवड्यात कमिन्सच्या आईचे निधन झाले असून सध्या तो कुटुंबियांसोबत आहे.
वनडे मालिकेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे वनडे संघ
भारतीय संघ – शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या (कर्णधार), रविंद्र जडेजा, वाशिंगटन सुंदर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कुलदीप यादव , उमरान मलिक, जयदेव उनादकट.
ऑस्ट्रेलिया संघ – डेविड वार्नर, ट्रॅविस हेड, स्टीव स्मिथ (कर्णधार), मारनस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, एलेक्स केरी (विकेटकीपर), कैमरून ग्रीन, एश्टन एगर, सीन एबॉट, मिशेल स्टार्क, एडम जम्पा, मिशेल मार्श, मार्कस स्टॉयनिस, जोश इंग्लिस , नाथन एलिस.
(Wasim Jaffer picked the probable playing XI for the first ODI against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुल की केएस भरत, कुणाला मिळणार डब्ल्यूटीसी फायनल खेळण्याची संधी?
आरसीबीला पहिला विजय मिळवून देणारी कनिका आहे तरी कोण? वनडेत ठोकलय चक्क त्रिशतक