भारतीय संघाचे माजी सलामीवीर वसीम जाफर हे ट्विटरवर आपल्या मजेशीर पोस्टसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. मागील काही काळापासून जाफर यांनी विनोदी ट्विट केलेले नव्हते, पण आता मात्र त्यांनी एका मजेशीर फोटोसह एकप्रकारे पुनरागमनच केले आहे. जाफर यांनी एक मजेशीर फोटो शेयर करत भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आपल्या आवडत्या अंपायारची निवड केली आहे.
भारत व न्युझीलंड मधील हा सामना साऊथॅम्प्टनमधील रोझ बाऊल येथे 18-22 जून दरम्यान खेळला जाणार आहे.
जाफर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. एक फोटो आहे इंग्लडचे अंपायर रिचर्ड केटलबर्ग यांचा आणि दुसरा फोटो आहे श्रीलंकेचे अंपायर कुमार धर्मसेना यांचा. या फोटो शेजारी जाफर यांनी आपले दोन फोटो लावले आहे. जाफर यांच्या फोटोतील हावभावातून स्पष्ट होते की त्यांना जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी केटलबर्ग यांच्या ऐवजी धर्मसेना अंपायर म्हणून हवे आहेत.
.@ICC #WTCFinal ???? pic.twitter.com/qdKPXgf1LG
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 24, 2021
जाफर यांनी ही मागणी करण्याचे मोठे कारण म्हणजे, 2014 पासून जेव्हा जेव्हा भारताच्या बाद फेरीच्या सामन्यात कॅटलबर्ग हे अंपयार म्हणून होते, तेव्हा तेव्हा भारताचा पराभव झालेला आहे. यामध्ये 2014 टी 20 विश्वचषक अंतिम सामना, 2015 विश्वचषकाचा उपांत्य सामना, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आणि 2019 विश्वचषक उपांत्य सामना यांचा समावेश होतो.
दुसरीकडे, धर्मसेना यांना निवडण्याचे कारण म्हणजे, ते 2019 विश्वकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंपयार होते. या अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडचा पराभव झाला होता. दरम्यान, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की जाफर यांनी हे सर्व विनोद निर्मितीसाठी केले आहे. मात्र तरी देखील हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की अंतिम सामन्यासाठी कोणत्या अंपायरची निवड केली जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: भारतात असताना कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूला अनुभव सांगताना कोसळले रडू
क्लार्क म्हणतो, ‘हा’ भारतीय जगातील सर्वोत्तम फलंदाज; तर अख्तर सर्वात वेगवान गोलंदाज






