भारतीय संघातील बरेच खेळाडू दुखापतींशी झगडत असल्याचे दिसत आहे. या खेळाडूंमध्ये प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाचा देखील समावेश आहे. तो आता एनसीएमध्ये राहून आपल्या फिटनेसच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचे समजते. तसेच तो लवकरच भारतीय संघात पुन्हा एकदा भारतीय संघात दिसण्याची शक्यता आहे. असे असले तरी तो आपल्या पूर्वीच्या लयीत गोलंदाजी करू शकतो का, असा सवाल भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफर याने विचारला आहे.
बुमराह पुनरागमन करणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर एका मुलाखतीत बोलताना जाफर म्हणाला,
“निर्विवाद बुमराह भारताचा सर्वोत्तम गोलंदाज आहे. विश्वचषकात भारतीय संघाला त्याची गरज पडणारच आहे आत्ताही डेथ ओवर्समध्ये आपल्याला त्याची उणीव नक्कीच भासते. मात्र, ज्यावेळी तो संघात पुन्हा येईल तेव्हा तो आधी ज्या प्रकारे गोलंदाजी करत तशाच प्रकारची गोलंदाजी करू शकेल का? आपण सर्वजण त्याच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहोत.”
लवकरच ऍक्शनमध्ये दिसणार बुमराह
जसप्रीत बुमराह मागील बऱ्याच महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला दुखापतीमुळे पाठीची सर्जरी करावी लागली. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे फिटनेस प्राप्त करतोय. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये आपण पुनरागमनासाठी तयार असल्याचे तो म्हणताना दिसलेला. आगामी आयर्लंड दौऱ्यावर होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत तो भारतीय संघाचा भाग असू शकतो.
(Wasim Jaffer Raised Question Over Jasprit Bumrah Bowling With Full Strength)
आणखी वाचा:
एशिया कप फायनलमध्ये यंग इंडियावर अन्याय? पंचांनी केल्या दोन अक्षम्य चुका
त्रिनिदाद कसोटीवर भारतीय संघाची मजबूत पकड! चौथा दिवस रोहित-किशनच्या नावे