दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात २०० हून अधिक धावा केल्यानंतरही भारतीय संघाला ७ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. संघाला आता दुसरा सामना रविवारी कटकमध्ये खेळायचा आहे. पुढील सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून काही खेळाडू कापले जाऊ शकतात. त्यात मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरचाही समावेश होऊ शकतो. पहिल्या टी२० सामन्यात श्रेयसने २७ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३६ धावा केल्या. मात्र, क्षेत्ररक्षणात त्याने सीमारेषेवर एक झेलही सोडला, त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफरने बराच काळ अय्यरच्या खेळाचे विश्लेषण केल्यानंतर आता त्याला एक खास सल्ला दिला आहे. जाफरने असेही सांगितले की श्रेयसला त्याच्या खेळाच्या कोणत्या विभागात सुधारणा करण्याची गरज आहे.
वसीम जाफरने (Wasim Jaffer) एक वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “तुम्हाला माहिती आहे की श्रेयस (Shreyas Iyer) जेव्हा अडकतो तेव्हा तो क्रिजवर खूप फिरतो. तुम्हाला तो वेगवान गोलंदाजांवर फारसे चौकार किंवा षटकार मारताना दिसणार नाही. त्याने तबरेझ शम्सीविरुद्ध धावा केल्या आणि नंतर इशान किशनने केशव महाराजांचे आव्हान स्वीकारले.”
२७ वर्षीय श्रेयसने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर फिरकीपटूंविरुद्ध तीन षटकार आणि एक चौकार लगावला. मात्र, पेसविरुद्ध त्याने १७ चेंडूत केवळ १३ धावा केल्या. आयपीएल २०२२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वाधिक धावा करणारा अय्यर तेथेही पेसविरुद्ध शांत होता. अय्यरने वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावा काढाव्यात अशी जाफरची इच्छा आहे.
जाफर म्हणाला की, “भविष्याकडे पहा, त्याला असे काही फटके विकसित करावे लागतील जेणेकरून तो वेगवान गोलंदाजांवरही वर्चस्व गाजवू शकेल. तो टॉप ४ मध्ये फलंदाजी करत आहे. तो खालच्या क्रमाने फलंदाजीला येतो असे नाही. त्यामुळे येथे त्याला आपला खेळ सुधारावा लागेल, विशेषत: वेगवान गोलंदाजांविरुद्ध चौकार मारल्यास त्याची खेळी थोडी चांगली होऊ शकली असती.”
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात झालेल्या पहिल्या सामन्यांत भारताने प्रथम फलंदाजी करत २११ धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजांना हे लक्ष्य रोखण्यास अपयश आले. त्यानंतर अनेकांकडून रिषभ पंतच्या नेतृत्वावर आणि भारतीय गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
हेही वाचा-
मैदानामध्ये महिला पीत होती ‘बियर’, डेरिल मिशेलच्या षटकाराने तिला म्हटले ‘चीयर्स’
शंभर नाही, तर दीडशेहून अधिक मॅच खेळले, पण कर्णधार पदापासून नेहमीच वंचित राहिले ‘हे’ भारतीय खेळाडू
लईच वाईट राव! ५ विस्फोटक भारतीय खेळाडू, पण त्यांच्या नशिबात वर्ल्डकपची एकही मॅच नव्हती