भारताचे दोन क्रिकेट संघ सध्या वेगवेगळ्या दौर्यावर आहेत. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी एक संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंड दौर्यावर तर, शिखर धवनच्या नेतृत्वात आणखी एक भारतीय संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौर्यावर आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे आणि टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाईल.
युवा सलामीवीर पृथ्वी शॉचा श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश आहे. मात्र, इंग्लंड दौर्यावर शुबमन गिल दुखापतग्रस्त झाला असून, पृथ्वी शॉला श्रीलंका दौऱ्यातून इंग्लंडला पाठवण्याची मागणी संघ व्यवस्थापनाने केली असल्याची बातमी समोर येतेय. या दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने पृथ्वी शॉबद्दल एक मजेदार मीम शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.
वसिम जाफरने शेअर केला मीम
भारताचा माजी सलामीवीर व सध्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचा फलंदाजी प्रशिक्षक असलेला वसिम जाफर सोशल मीडियावर आपल्या मजेदार अंदाजासाठी ओळखला जातो. जाफरने पृथ्वी शॉ याला इंग्लंड ला पाठवायचे की श्रीलंकेत ठेवायचे या प्रकरणावर एक मीम शेअर केला. त्याने बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याच्या ‘फुल और कांटे’ चित्रपटातील एक दृश्य मीम म्हणून वापरले आहे. ज्यामध्ये अजय देवगन एकाच वेळी दोन गाड्यांवर पाय ठेवून उभा असलेला दिसतोय.
या मीममध्ये जाफरने एका गाडीला ‘इंग्लंड विरुद्ध भारत’ आणि दुसऱ्या गाडीला ‘श्रीलंका विरुद्ध भारत’ असे म्हटले तर, अजय देवगन याला पृथ्वी शॉ म्हणून दाखवले आहे. या मीमला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
Go well @PrithviShaw ???????????? #SLvIND #ENGvIND pic.twitter.com/7QNXYCQujS
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) July 5, 2021
पृथ्वीला इंग्लंड दौऱ्यावर पाठवण्याची मागणी
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या युवा सलामीवीर शुभमन गिलला गुडघ्याची दुखापत झाली असून, तो या दौर्यातून बाहेर पडला असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला पर्याय म्हणून श्रीलंका दौऱ्यावर असलेले दोन सलामीवीर पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल यांना इंग्लंडला पाठवण्यात यावे, अशी मागणी संघ व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. मात्र, निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा ही मागणी मान्य करतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. याबाबत बीसीसीआय अध्यक्ष सर्व गांगुली व सचिव जय शहा यांच्याशी देखील चर्चा होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका क्रिकेटमधील दुष्टचक्र थांबेना, आता सापडले मॅच फिक्सिंगच्या विळख्यात
जेम्स अँडरसनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केली ‘मोठी’ कामगिरी
रोहितसह ‘हा’ खेळाडू असावा टी२० विश्वचषकासाठी सलामीवीर, माजी खेळाडूने सुचविला पर्याय






