भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्यात अपयश आले. श्रीलंका संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ करत भारतीय संघाला 16 धावांनी पराभूत केले. भारतीय संघाला या सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर माजी सलामीवीर वसीम जाफर याने भारतीय कर्णधार हार्दिक पंड्या याच्या चुकांवर बोट ठेवले आहे.
मोठ्या संख्येच्या झालेल्या या सामन्यात हार्दिक पंड्याने काही चुका केल्याचे जाफर याने म्हटले. तो म्हणाला,
“सामना गमावला मात्र हार्दिकने काही चुका देखील केल्या. त्याने पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केलेल्या शिवम मावी याच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. अर्शदीप चौथे पाचवे षटक टाकू शकला असता. मावीला पहिल्या दोन षटकातच चेंडू हाताळायला देणे गरजेचे होते.”
यापुढे जात जाफर म्हणाला,
“अर्शदीपची चारही षटके पूर्ण करून घेणे गरजेचे होते. त्याचा दिवस खराब होता. मात्र, पावर प्लेनंतर ते दोन षटके आरामात टाकू शकला असता. तसेच, डेथ ओवर्समध्ये हार्दिकने स्वतः देखील जबाबदारी घ्यायला हवी.”
भारत आणि श्रीलंका यांत्यातील गुरुवाच्या सामन्याचा विचार केला, तर या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार शनाकाने अवघ्या 22 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 6 षटकार देखील ठोकले. कुसल मेंडिसने (52) श्रीलंकेसाठी दुसऱ्या सर्वाधिक धावा केल्या. त्यांच्या योगदानामुळे भारतासमोर विजयासाठी 207 धावांचे मोठे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पावरप्लेमध्ये 4 विकेट्स गमावल्या. सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी वेगवान अर्धशतके ठोकत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. मालिकेतील अखेरचा सामना शनिवारी (7 जानेवारी) राजकोट येथे खेळला जाईल.
(Wasim Jaffer Talk On Hardik Pandya Captaincy)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा तर गोलंदाजांचा अपमान’, रन-आऊट प्रकरणात अश्विनने घेतली ऍडम झम्पाची बाजू, डेविस हसीला सुनावले
श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा फिट, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले गेले यशस्वी उपचार