---Advertisement---

‘ए मुंह से सुपारी निकालकर बात कर रे बाबा’, गुटखा खाऊन कानपूर कसोटी पाहणाऱ्या प्रेक्षकाची जाफरने घेतली फिरकी

---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सध्या २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दोन्ही दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला राहिला आहे. तसेच कानपूरमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीतील पाहिलाच सामना खेळत असलेल्या श्रेयस अय्यरने तुफानी खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला पहिल्या डावात ३४५ धावा करण्यात यश आले आहे. दरम्यान या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे.

गुरुवारी (२५ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस पार पडला. यावेळी कॅमेरामॅनने टिपलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सामना पाहण्यासाठी आलेला एक प्रेक्षक गुटखा खाताना दिसून येत आहे. अशातच भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी एक मिम शेअर केला आहे, जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

वसीम जाफर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते काही ना काही शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. त्यांनी कानपूर कसोटी सामना पाहण्यासाठी आलेल्या या प्रेक्षकाचे देखील हटके मिम बनवले आहे.

वसीम जाफर यांनी या व्यक्तीचा फोटो हेरा फेरी चित्रपटातील बाबूरावसोबत जोडला आणि फोटोमध्ये लिहिले की, “जो व्यक्ती या गुटखा खाणाऱ्याशी फोनवर बोलत आहे, तो म्हणतोय,’ए मुंह से सुपारी निकाल कर बात कर रे बाबा.’

भारतीय संघाला ३४५ धावा करण्यात आले यश
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून पदार्पण करत असलेल्या श्रेयस अय्यरने सर्वाधिक १०५ धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने ५२ धावांचे योगदान दिले. तसेच अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने तुफानी खेळी करत अर्धशतक झळकावले. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला ३४५ धावा करण्यात यश आले.

महत्त्वाच्या बातम्या-

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी मुंबईचा संघ जाहीर; सलग ६ षटकार मारणाऱ्या खेळाडूला दिली संधी

कानपूर कसोटीत आता भारताचा विजय निश्चित? गेल्या ८ वर्षांपासूनचा ‘हा’ विक्रम देतोय विजयाची ग्वाही

टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याने मोडले सर्व विक्रम, ठरला सर्वाधिक पाहिला जाणारा सामना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---