भारताचा माजी अनुभवी फलंदाज राहुल द्रविडने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यास सहमती दर्शविली. द्रविड आधी या जबाबदारीसाठी तयार नव्हता. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आग्रह धरल्यानंतर त्याने ते मान्य केले. ४९ वर्षीय द्रविड भारताच्या महान खेळाडूंपैकी एक असून, ते इंडिया अ आणि एकोणीस वर्षाखालील संघाचा मुख्य प्रशिक्षक पदाची जबाबदारीही सांभाळली आहे.
त्याच्या मार्गदर्शनखाली रिषभ पंत, आवेश खान, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी आणि शुबमन गिलसारख्या खेळाडूंनी कनिष्ठ स्तरापासून राष्ट्रीय संघाचा प्रवास केला. तसचे त्याने तो बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक बनल्याच्या बातमीनंतर चाहत्यांच्या आणि दिग्गजांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरही येऊ लागल्या.
वासिम जाफरची मजेदार प्रतिक्रिया
भारतीय संघाचा माजी सलामीवीर व आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचा प्रशिक्षक असलेल्या वासिम जाफर याने द्रविडच्या नियुक्तीनंतर मजेदार ट्विट केले होते.
त्याने लिहिले, ‘कालपर्यंत बातम्या होत्या की राहुल द्रविड एनसीएमध्येच कार्यरत राहील. मात्र, तो भारताचा प्रशिक्षक बनल्याची बातमी सकाळी लवकर आली. मध्यरात्रीच्या सुमारास असे काय घडले? माझा सर्वोत्तम अंदाज आहे की, शार्दुल ठाकूरने आपल्या वाढदिवसाच्या मेणबत्त्या फुंकताना राहुल द्रविड भारताचे प्रशिक्षक व्हावे अशी इच्छा व्यक्त केली असेल.’
Till yesterday news reports were saying Rahul Dravid was going to stay at the NCA. Yet early morning news broke of him becoming India coach. So what happened around midnight? My best guess is Lord Shardul blew candles on his birthday cake wishing to be coached by Rahul bhai 😊
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) October 16, 2021
जगातील इतर संघांनी सावध राहावे
यापूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने राहुल द्रविड भारताचा प्रशिक्षण मिळणार असल्याचे वृत्त आल्यानंतर ट्विट करताना लिहिले होते, ‘द्रविड भारताचा प्रशिक्षक होणार ही बातमी खरी असेल तर जगातील सर्व संघांनी सावध राहावे.’
If it’s true Rahul Dravid is to be the next Indian coach I think the rest of the world better beware … !
— Michael Vaughan (@MichaelVaughan) October 15, 2021
या व्यतिरिक्त अनेक दिग्गजांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष- सहा चेंडूत सहा षटकार खेचणाऱ्या शार्दुल ठाकुरविषयी काही खास माहिती
टी20 विश्वचषकात ‘या’ 3 संघांचा उठू शकतो बाजार, एकाने दोनदा जिंकलाय विश्वचषक