---Advertisement---

बापरे! एबीचा पावरफूल शॉट पाहून गोलंदाजही हादरला, स्टम्पला लागून चेंडू…

On: मंगळवार, ऑक्टोबर 13, 2020 10:26 PM
---Advertisement---

आयपीएल २०२० च्या २८ व्या सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. हा सामना बेंगलोरने ८२ धावांनी जिंकला. बेंगलोरकडून या सामन्यात विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सने ३३ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. यामध्ये ५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. सोबतच ऍरॉन फिंच (४७), विराट कोहली (३३) आणि देवदत्त पडिक्कलने (३२) धावा केल्या. या फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर बेंगलोरने प्रथम फलंदाजी करत १९४ धावा केल्या होत्या. या विजयासह बेंगलोरने २ गुण मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये तिसरा क्रमांक मिळवला.

शारजाहच्या या मैदानावर डिविलियर्सची तडाखेबंद खेळी पाहायला मिळालीच. पण त्याबरोबरच एक असाही देखावा पाहायला मिळाला, ज्याने प्रत्येकाला आश्चर्यचकित केले.

https://twitter.com/faceplatter49/status/1315675523020857345

खरंतर जेव्हा एबी आणि विराट कोहली फलंदाजी करत होते आणि वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करत होते. त्यादरम्यान कोलकाताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा टाकत असलेल्या षटकात असे काही घडले की, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. कृष्णाच्या १३ व्या षटकातील एका चेंडूवर डिविलियर्सने सरळ फटका मारला, तो थेट जाऊन नॉन स्ट्रायकर एन्डच्या स्टम्पवर लागला.

डिविलियर्सने मारलेला हा शॉट इतका जोरदार होता, त्यामुळे चेंडू स्टम्पवर लागूनही थांबला नाही. तो चेंडू शॉर्ट मिड ऑनवर असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे वेगाने गेला. परंतु क्षेत्ररक्षकाने डाइव्ह मारूनही तो चेंडू थांबवू शकला नाही. त्यामुळे जिथे एक धावही मिळणार नव्हती, तिथे फलंदाजाला ४ धावा मिळाल्या. गोलंदाज कृष्णाही हे पाहून नाराज झाला.

बेंगलोरचा पुढील सामना गुरुवारी (१५ ऑक्टोबर) शारजाह येथे किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अफलातून! डिविलियर्सने मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेरील चालत्या कारवर, पाहा व्हिडिओ

-‘डिविलियर्स नाहीतर ‘या’ खेळाडूला सामनावीर पुरस्कार द्या…’, बेंगलोरच्या विजयानंतर ट्विटरवर पडला प्रतिक्रियांचा पाऊस

-मिस्टर ३६०ची ‘ही’ करामत पाहून कोणताही गोलंदाज म्हणेल, याला बॉलिंग नकोच

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएल २०२०: चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा ‘असे’ ३ खेळाडू

-एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेला विराटचा मित्र बिहारच्या राजकारणात ठरतोय ‘किंग’

-स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---