---Advertisement---

PBKS vs MI: श्रेयसची शानदार खेळी पाहून नीता-आकाश अंबानींच्या चेहऱ्यावरचे होश उडाले! पाहा व्हिडिओ

On: सोमवार, जून 2, 2025 9:38 AM
---Advertisement---

आयपीएल 2025 क्वालिफायर दोन सामन्यात पंजाबने मुंबईला पराभूत करत 5 विकेट्सने सामना जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. (Punjab kings vs mumbai indians,qualifier 2) महत्त्वाचं म्हणजे पंजाबसाठी श्रेयस अय्यर (shreyas iyer) खेळताना मुंबई इंडियन्सवर (mumbai indians) भारी पडला. आधी दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals), नंतर कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) आणि आता पंजाब किंग्सला (punjab kings) त्याने आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवलं आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2020 स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं आणि ट्रॉफी देखील जिंकून दिली. आता पंजाबचा संघ आपल्या पहिल्या जेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. पंजाबचा अंतिम सामना 3 जूनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणार आहे.

पंजाब किंग्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 204 धावा करायच्या होत्या. या दबावाच्या सामन्यात 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणं मुळीच सोपं नव्हतं. त्यामुळे दबाव पूर्णपणे पंजाब किंग्स संघावर होता. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्स संघाकडून प्रियांश आर्य (priyansh aarya) आणि प्रभसिमरन सिंगची (prabhsimran singh) जोडी मैदानावर आली. या महत्वाच्या सामन्यात या जोडीकडून चांगल्या सुरूवातीची गरज होती. मात्र प्रभसिमरन सिंग अवघ्या 6 धावांवर माघारी परतला. तर प्रियांश आर्य अवघ्या 20 धावांवर माघारी परतला. सलामी जोडी फ्लॉप ठरल्यानंतर जोस इंग्लिशही (josh English) 38 धावा करत माघारी परतला.

पंजाब किंग्स संघाला एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसत होते. पण संघातील सर्वात विश्वासू आणि जबाबदार खेळाडू शेवटपर्यंत उभा होता. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून श्रेयस अय्यरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. आज संघाला सर्वात जास्त गरज असताना, श्रेयस अय्यर शेवटपर्यंत उभा राहिला. श्रेयसची ही शानदार खेळी बघून नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे होते. तो एकापाठोपाठ एक मोठे शॉर्ट्स खेळत होता ज्याचा मुंबईला फटका बसला.
श्रेयसने 41 चेंडूंचा सामना करत नाबाद 87 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान 5 चौकार आणि 8 षटकार मारले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---