आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संपल्यानंतर आता भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या २ सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने २-० ची आघाडी घेतली आहे. तसेच दुसऱ्या सामन्यात हर्षल पटेलला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केल्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. हा सामना झाल्यानंतर युझवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांच्यात मजेशीर चर्चा पाहायला मिळाली होती. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहल हा आपल्या मजेशीर स्वभवासाठी प्रसिद्ध आहे. अनेकदा तो मस्ती करताना दिसून आला आहे. तसेच सामना झाल्यानंतर मजेशीर मुलाखती देखील घेताना दिसून आला आहे. न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे. परंतु, त्याला पहिल्या दोन्ही सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हेनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते.
राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी संघाची जबाबदारी घेतल्यापासून युझवेंद्र चहलला संधी दिली नाहीये. अक्षर पटेल आणि आर अश्विन या फिरकी गोलंदाजांना संधी दिली जात आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये युझवेंद्र चहलने हर्षल पटेलला विचारले की, “तू गेल्या १० वर्षांपासून माझा रूममेट आहेस, आता तुला भारतीय संघात येण्याची संधी मिळाली आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी तुला इतका वेळ का लागला? या प्रश्नाचे उत्तर देत हर्षल पटेल म्हणाला की, “होय, वेळ तर लागला. परंतु मला या गोष्टीचे कधीच वाईट वाटले नाही.”
युझवेंद्र चहलने जेव्हा विचारले की, पहिल्याच सामन्यात तुला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे. तर कसं वाटत आहे? याबाबत बोलताना हर्षल पटेल म्हणाला की,” मी विचारही नव्हता केला की हा पुरस्कार मला मिळेल. मला वाटले होते केएल राहुल या पुरस्काराचा हकदार आहे.” त्यावेळी मस्ती करत युझवेंद्र चहल म्हणाला की, “ठीके ठीके तुला नको, तर दे केएलला.”
त्यानंतर दोघांमध्ये एबी डिविलियर्स निवृत्त झाल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत बोलताना हर्षल पटेल म्हणाला की, “त्याने नेहमीच संघाला अडचणीतून बाहेर काढण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. जेव्हा जेव्हा संघाला फलंदाजाची आवश्यकता असायची की, कोण जाणार आता फलंदाजीला, त्यावेळी एबीचा हात नेहमी वर असायचा. त्याच्या जाण्याने संघाला निश्चितच धक्का बसेल.”
हर्षल पटेलने या सामन्यात ४ षटक गोलंदाजी केली आणि २५ धावा खर्च करत २ गडी बाद केले होते.
Debut for #TeamIndia 👍
Debut on Chahal TV 📺
Special message for @ABdeVilliers17 😊Enjoy this special segment of @yuzi_chahal chatting up with @HarshalPatel23 after India's win in Ranchi. 😎 😎 – By @28anand
Full interview 🎥 🔽 #INDvNZ @Paytm https://t.co/oc0PEF4ou4 pic.twitter.com/G5Ot2qlXdp
— BCCI (@BCCI) November 20, 2021
दुसऱ्या टी २० सामन्यात भारतीय संघाचा जोरदार विजय
तसेच दुसऱ्या टी -२० सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली होती. तर मार्टिन गप्टीलने ३१ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ६ बाद १५३ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्माने ५५ धावांचे योगदान दिले होते. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
“मला घरी बोलावून असा बर्गर खायला दिला” आर अश्विनचे कौतुक करत वसीम जाफरने शेअर केले मजेशीर मिम
धोनीला चेन्नईत खेळता येणार अखेरचा टी२० सामना? जय शाह यांनी केले मोठे भाष्य
अभूतपूर्व कामगिरी! एकाच डावात १० बळी घेत आफ्रिकेचा अष्टपैलू आला प्रसिद्धीझोतात