---Advertisement---

गंभीरचं धोनीसोबतचं नातं आहे ‘खंबीर’! लखनऊच्या मेंटॉरने चेन्नईच्या माजी कर्णधाराची घेतली भेट, Photo

On: शुक्रवार, एप्रिल 1, 2022 1:46 PM
MS-Dhoni-Gautam-Gambhir
---Advertisement---

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२२मधील सातव्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सने चेन्नई सुपर किंग्जला ६ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने ७ विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊने १९.३ षटकातच ४ विकेट्सच्या नुकसानावर त्यांचे लक्ष्य पूर्ण केले. या थरारक सामन्यानंतर एक अशी घटना घडली, ज्याने क्रिकेटप्रेमींचे हृदय जिंकले आहे.

चेन्नई विरुद्ध लखनऊ (CSK vs LSG) संघातील सामना संपल्यानंतर चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) आणि लखनऊ संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी एकमेकांची भेट घेतली. हे दोन्ही दिग्गज भेटीदरम्यान (Gambhir Meets Dhoni) एकमेकांशी बोलतानाही दिसले. या प्रसंगाने क्रिकेटचाहत्यांचे लक्ष वेधले आहे. कारण सोशल मीडियावर नेहमीच धोनी आणि गंभीरमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याच्या चर्चा होत असतात. परंतु धोनी आणि गंभीरच्या भेटीचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. 

गंभीरनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या धोनीसोबतच्या भेटीचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘कर्णधाराला भेटून चांगले वाटले’. त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

https://www.instagram.com/p/Cbx9CRnvF1R/?utm_source=ig_web_copy_link

चेन्नईची निराशाजनक सुरुवात, तर लखनऊने उघडले विजयाचे खाते
दरम्यान नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई संघाच्या आयपीएल अभियानाची चांगली सुरुवात झालेली नाही. लखनऊने त्यांना पराभूत केल्यामुळे संघाने हंगामातील सलग दुसरा सामना गमावला आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने हंगामातील उद्घाटन सामन्यात चेन्नईला ६ विकेट्स राखून पराभूत केले होते. त्यामुळे नवा कर्णधार रविंद्र जडेजाच्या नेतृत्त्वाखाली चेन्नईची निराशाजनक सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे केएल राहुलच्या नेतृत्त्वाखाली लखनऊ संघाचा हा हंगामातील पहिला विजय होता. लखनऊचा पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध झाला होता. शेवटच्या षटकापर्यंत गेलेल्या या सामन्यात त्यांना ५ विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.

या सामन्यानंतर लखनऊ संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर चेन्नई संघ आठव्या क्रमांकावर घसरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेटच्या मैदानात फक्त पोरांमध्येच नाही पोरींमध्येही होतो राडा! पाहा महिला खेळाडूंच्या बाचाबाचीचा व्हिडिओ

आयपीएलला मिस करतोय सॅम करन; म्हणाला, ‘मला आयपीएलमध्ये सहभागी व्हायचे होते, पण…’

IPL2022| कोलकाता वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---