भारतीय संघ 23 जूनला आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. या प्रवासादरम्यानच्या काही मजेदार क्षणांचा व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
या व्हिडिओत दिसते की अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि गोलंदाज युजवेंद्र चहल विमानात अन्य भारतीय खेळांडूंची मुलाखत घेत आहेत.
या मुलाखती दरम्यान त्यांनी इंग्लंड दौऱ्याविषयी काय वाटते असे सर्वांना विचारले. यात सर्वप्रथम हार्दिकने कर्णधार विराटला या दौऱ्याविषयी विचारले. त्यावर विराट म्हणाला, या दौऱ्यासाठी तो खूप उत्सुक आहे. तसेच याआधी तो 2-3 वेळा इंग्लंडला गेला आहे.
त्यामुळे तो लंगनच्या वेगवेगळ्या रस्त्यांवर संघातील नवीन खेळाडूंना घेऊन जाईल. विशेषतः इंग्लंडला पहिल्यांदाच जाणाऱ्या केएल राहुलला.
VIDEO: In-flight entertainment: @hardikpandya7's verbal volleys for @imVkohli & boys.
▶️https://t.co/g1rVPWXOfj pic.twitter.com/TgVEMLpH57
— BCCI (@BCCI) June 26, 2018
विराटनंतर हार्दिक आणि चहलने उमेश यादव, कुलदीप यादव आणि मनीष पांडे यांच्याबरोबरही छोटा संवाद साधला. त्यानंतर त्यांनी आपल्या लॅपटॉपवर काम करत असलेल्या दिनेश कार्तिककडे आपला मोर्चा वळवला.
त्याने या व्हिडिओचे कारण हार्दिकला विचारले. यानंतर केएल राहुलला या दौऱ्याविषयी विचारल्यावर तो म्हणाला पहिल्यांदाच इंग्लंडला जात असल्याने तो खूप उत्सुक आहे.
या व्हिडिओत मजेदार गोष्ट तेव्हा पहायला मिळली जेव्हा हार्दिक कॅप्टनकूल एमएस धोनीला म्हणाला मी थोड्यावेळात तुझ्याकडेपण येतो त्यावर धोनीने त्याच्याकडे उशी फेकून मारली. तसेच जेव्हा हार्दिक आणि चहल धोनीशी बोलायला गेले तेव्हा मजेने धोनीने त्यांच्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केले आणि हार्दिकला एक चिप्स देऊन पुढे जायला सांगितले.
जेव्हा हार्दिक पुढे गेला तेव्हा धोनी गमतीने हसायला लागला. धोनीच्या आधी हार्दिक आणि चहलने रोहित शर्माशीही संवाद साधला. यावेळी रोहितने संघाबरोबर आल्याने आनंद झाला असल्याचे सांगितले. तसेच मजेने चहलला डिओड्रंट वापरायला सांगितला.
भारतीय संघ या 3 महिन्याच्या दौऱ्यात आयर्लंड विरुद्ध 2 टी20 सामने आणि इंग्लंड विरुद्ध 3 टी20, 3 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळणार आहे.
आयर्लंड विरुद्ध टी20 मालिका 27 जूनपासून सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–अजिंक्य रहाणेने मिळवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची शाब्बासकी
–अर्जून तेंडूलकरमुळे भारतीय संघात घराणेशाहीचे दर्शन! चाहत्यांचा हल्लाबोल
–या खास कारणामुळे केदार जाधवने मानले पत्नीचे आभार