भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहा नेहमीच आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंट द्वारे विविध व्हिडिओ शेअर करत असते.हसीन जहा नुकतीच आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओसाठी चर्चेत आली आहे. हसिन जहाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून गीतकार बादशाच्या ‘ हाय गर्मी ‘ या गाण्यावर जबरदस्त डान्स केलेला आहे. या गाण्यात ती आपल्या पार्टनर सोबत जबरदस्त डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. 15 सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
स्ट्रीट डान्सर 3 या चित्रपटात संगीतकार बादशहाने हे गाणे गायलेले होते. प्रदर्शित झाल्यापासूनच या गाण्याची सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात चर्चा असते. अनेक लोक या गाण्यावर डान्स करत व्हिडिओ शेअर करत असतात. यादरम्यान हसीन जहाचा हा व्हिडीओ ही लोकांना मोठ्या प्रमाणात पसंत येत आहे. हसिन जहाने या व्हिडिओची शूटिंग आपल्या घराच्या छतावर केली होती. काही मिनीटातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला आहे.
https://www.instagram.com/p/CJck7rIgIUC/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान हे माहीत असणे गरजेचे आहे की, हसीन जहा व मोहम्मद शमी यांचे संबंध मागील बऱ्याच वर्षांपासून बिघडलेले आहेत. दोघेही एकमेकांपासून विभक्त आहेत. शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे भारतात परतला असून, तो सध्या आपल्या दुखापतीतून सावरत आहे. शमी बद्दल मागेच बातमी समोर आली होती कि तो कमीत कमी 6 आठवडे क्रिकेटपासून दूर झालेला आहे.
महत्वाच्या बातम्या:
– एनसीएची इच्छा होती की रोहितने त्याचे वजन थोडे कमी करावे, पाहा कोणी केलंय हे भाष्य
– म्हणून आयसीसीला मागावी लागली बेन स्टोक्सची माफी
– टीम इंडिया सावधान! ऑस्ट्रेलियाचा हा खेळाडू करतोय पुनरागमन