इंग्लंड क्रिकेट संघ सध्या ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेटमध्ये प्रदर्शन करत आहे, त्यानंतर ‘बझबॉल’ची चर्चा होत आहे. अनेकांना अजूनही माहिती नाहीये की, हे बझबॉल नेमके आहे तरी काय?. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडलाही अद्याप याविषयी जास्त काही माहिती नाहीये. एजबस्टन कसोटीतीत पराभव स्वीकारल्यानंतर द्रविडला बझबॉलविषयी प्रश्न विचारला गेला. या प्रश्नावर द्रविडने जे उत्तर दिले, त्याची चांगचील चर्चा होत आहे.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील मागच्या वर्षीचा राहिलेला एकमात्र कसोटी सामना १ जुलै रोजी बर्मिंघमच्या एजबस्टन क्रिकेट स्टेडियवर सुरू झाला होता. मंगळवारी (५ जुलै) हा सामना इंग्लंडने ७ विकेट्स राखून जिंकला. कसोटी मालिकेतील पहिले चार सामने मागच्या वर्षी खेळले गेले होते आणि आता शेवटचा सामना इंग्लंडने जिंकला आहे. या विजयानंतर मालिका २-२ अशा बरोबरीवर सुटली आहे.
इंग्लंडकडून कसोटी सामन्यात पराभव मिळाल्यानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) पत्रकार परिषदेत बोलत होता. पत्रकाराने द्रविडला विचारले की, “बझबॉल…बझबॉल… तुम्ही हे ऐकले आहे का? अनेकजण म्हणत आहेत की, यामुळे संपूर्ण क्रिकेट बदलले आहे. तर तुम्ही बझबॉलविषयी काय म्हणाल?.” पत्रकाराच्या या प्रश्नावर द्रविड सुरुवातीला तर थोडा हसला आणि पुढे म्हणाला, “मला हे माहीत नाहीये की बझबॉल काय आहे?, पण गोष्ट नक्की आहे की, त्यांनी अप्रतिम क्रिकेट खेळले.”
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1544319301737680896?s=20&t=ZhwYW8wQ6_l3OhxeQE_sTw
दरम्यान, मागच्या वर्ष इंग्लंड संघासाठी खूपच खराब गेले होते. ऍशेस मालिकेतील पराभवानंतर संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक बदलले गेले. बेन स्टोक्स आता कर्णधार आहे, तर ब्रँडन मॅक्युलम मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. ब्रँडन मॅक्युलम (Brendon McCullam) प्रशिक्षक बनल्यापासून संघ अधिक आक्रमकतेसह खेळत आहे आणि त्याचा फायदाही संघाला झाला आहे. मॅक्युलमच्या याच रणनीतीला बझबॉल असे म्हटले जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडविरुद्धचा पराभव भारताच्या जिव्हारी; WTCमधील २ गुण तर कापले गेलेच, पाकिस्तानलाही झालाय फायदा
विहारी भारताच्या पराभवास जबाबदार, सोडला बेयरस्टोचा महत्त्वाचा कॅच; नाहीतर निकाल असता वेगळा
इंंग्लंड विरुद्धच्या पराभवानेे भारताच्या टेस्ट चॅम्पियनशीपच्या अडचणी वाढल्या, वाचा काय आहे समीकरण