भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात गुरुवारी (08 सप्टेंबर) झालेला आशिया चषक 2022 मधील पाचवा सुपर-4 सामना रोमांचक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली याच्या शतकाच्या जोरावर भारताने 212 धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 111 धावांवरच गारद झाला आणि भारताने 101 धावांच्या फरकाने सामना जिंकला. या सामन्यादरम्यान भारताचे दोन यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि रिषभ पंत यांच्यात मजेशीर संभाषण झाले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
त्याचे झाले असे की, अफगाणिस्तानविरुद्धच्या (INDvsAFG) सामन्यात कार्तिकने (Dinesh Karthik) गोलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याची ही 37 वर्षीय कार्तिकची पहिलीच वेळ होती. यावरूनच यष्टीमागे उभा असलेल्या पंतने (Rishabh Pant) चालू सामन्यात कार्तिकला मजेशीर विधान म्हटले.
भारताच्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 100 पेक्षा जास्त धावांची गरज होती. अशावेळी प्रभारी कर्णधार केएल राहुलने शेवटचे विसावे षटक कार्तिकला फेकण्यासाठी बोलावले. 170 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या कारकिर्दीतीत कार्तिकने कधीही गोलंदाजी केली नव्हती. अशात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी 2 षटकारांसह या षटकात 18 धावा खेचल्या. त्यातही एब्राहिम झारदानने कार्तिकलच्या सलग 2 चेंडूंवर 2 षटकार मारले आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले.
सलग 2 षटाकारांनंतर झारदानने पुढील चेंडू एक्स्ट्रा कव्हरला मारत 2 धावा काढल्या. यानंतर थोडासा दबावात आलेल्या कार्तिकला पाहून यष्टीमागून पंतने मजेशीर वाक्य बोलले. पंत म्हणाला की, ‘डीके भाई, सब कंट्रोल में है ना? (डीके भाऊ, सर्वकाही नियंत्रणा आहे ना?)’. पंतचे हे मजेशीर वाक्य स्टंप माईकमध्ये कैद झाले आहे.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1568113906039799808?s=20&t=9YVDCdIV6PhfSaJSWWSX-w
Rishabh Pant reaction is hilarious! pic.twitter.com/VC4KS0Elb2
— The Game Changer (@TheGame_26) September 9, 2022
भारताचा मोठा विजय
दरम्यान भारतीय संघाने सुपर-4 फेरीतील सलग 2 सामने गमावल्याने त्यांचा आशिया चषकातील प्रवास अगोदरच संपुष्टात आला होता. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना भारताचा शेवटचा सामना होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराटच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने 212 धावा फलकावर लावल्या. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ 111 धावाच करू शकला. परिणामी भारताने 101 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अमित मिश्राला ट्रोल करण्याचा प्रयत्न पाकिस्तानी अभिनेत्रीला पडला महागात, गोलंदाजांने दिलय चोख प्रत्युत्तर
कोहलीच्या सलामीच्या स्थानावरून भडकला राहुल; म्हणतोय, ‘तर मी काय संघाबाहेर जाऊ?’
कॅप्टन साहेबांची शुद्ध हिंदी ऐकून विराटला आवरले नाही हसू, रोहितला केले ट्रोल