क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे केव्हा काय घडेल याचा अंदाज लावता येत नाही. असेच काहीसे नुकतेच बांगलादेश प्रीमीयर लीग २०२२ च्या (Bangladesh Premier League 2022) दुसऱ्या सामन्यात धाकड अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell)सोबत घडले आहे. ढाका प्लॅटून संघाकडून खुलना टायगर्सविरुद्ध खेळताना तो अतिशय विचित्र पद्धतीने धावबाद झाला आहे. त्याच्या या अनोख्या पद्धतीने धावबाद होण्याच्या (Andre Russell Runout) प्रसंगाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे. अगदी त्याची आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)नेही त्याच्या अशाप्रकारे बाद होण्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
त्याचे झाले असे की, ढाका संघाची फलंदाजी सुरू असताना १५ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रसेलने हलकासा शॉट मारला आणि तो एक धाव घेण्यासाठी पळाला. त्यामुळे नॉन स्ट्राईकवर असलेला महमुदुल्लाहही धाव पूर्ण करण्यासाठी पळाला. इतक्यात थर्डमॅनवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या मेहदी हसनने पटकन चेंडू पकडला आणि महमुदुल्लाह पळत असलेल्या स्ट्राइकिंग एंडकडे वेगाने थ्रो केला. त्याने मारलेला थ्रो स्टंप्सला लागला सुद्धा, पण तोपर्यंत महमुदुल्लाह क्रिजच्या आत पोहोचला होता. त्यामुळे तो धावबाद होण्यापासून वाचला.
पण खरी करामत पुढे घडली. स्ट्राईकवरील स्टंप्स उडवल्यानंतर तो चेंडू पुढे जाऊन नॉन स्ट्राइकिंग एंडला जाऊन धडकला. रसेल या दिशेने धावत होता. दुर्दैवाने चेंडू स्टंप्सला येऊन लागेपर्यंत रसेल क्रिजपर्यंत पोहोचू शकला नव्हता. परिणामी त्याला धावबाद होत पव्हेलियनला परतावे लागले. तो केवळ ७ धावांवर विचित्र पद्धतीने धावबाद झाला.
WHAT A BIZARRE RUN OUT! 😱
📺 Watch the #BPL2022 match live on #FanCode 👉 https://t.co/wPDmICv8cM#BPLonFanCode pic.twitter.com/O43gKKfLSi
— FanCode (@FanCode) January 21, 2022
https://www.instagram.com/tv/CZCXzSWIxB_/?utm_source=ig_web_copy_link
रसेलची आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्या या विचित्र विकेटची मजा घेतली आहे. त्यांनी रसेलच्या धावबाद विकेटचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर त्यांनी कॅप्शन देत लिहिले आहे की, ‘मी रडू की हसू… करू मी काय करू..!’
स्वत रसेलनेही त्याच्या अशा आगळ्यावेगळ्या आणि अनपेक्षितपणे धावबाद होण्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘हा तर वेडेपणा आहे.’
महत्त्वाच्या बातम्या-
‘चांगला खेळ, पण मर्यादा ओलांडू नकोस’, पंतची विकेट घेणाऱ्या द. आफ्रिकी गोलंदाजाची खास पोस्ट
विजयी शेवट करण्यासाठी माजी क्रिकेटरचा टीम इंडियाला ‘मंत्र’, असे करण्यात यशस्वी होतील का गोलंदाज?
हेही पाहा-