---Advertisement---

‘कोहलीचा भिडू’ राजस्थानात जाऊन आहे खुश, व्हिडिओ शेअर करत पडिक्कलने दिलीय अशी प्रतिक्रिया

Devdutt Padikkal
---Advertisement---

मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर (RCB) संघाकडून खेळत शानदार कामगिरी करणारा २१ वर्षीय फलंदाज देवदत्त पडिकल याला २०२२ च्या आयपीएल लिलावात(IPL Mega Auction 2022) राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने ७.७५ कोटींना विकत घेतले आहे. या लिलावात त्याने आपली मुळ किंमत २ कोटी रुपये एवढी ठेवली होती. देवदत्त आयपीएलच्या १५ व्या हंगामात राजस्थान राॅयल्स संघाकडून फलंदाजी करताना दिसणार आहे. यानंतर त्याने सोशल मिडियावर एक व्हिडीओ शेअर करत फ्रॅंचायझीचे आभार मानले आहेत.

मुळचा कर्नाटकचा असलेल्या देवदत्त पडिकलवर सुरुवातीला त्याची जुनी फ्रॅंचायझी आरसीबी आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी बोली लावली. पण शेवटी त्याला राजस्थानने विकत घेतले.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर संघाकडून २०२० मध्ये देवदत्तने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण या सलामीवीराला लिलावापुर्वी आरसीबी संघाने रिटेन केले नाही, त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकीत झाले होते. त्याने आयपीएलच्या २९ सामन्यांमध्ये ८८४ धावा केल्या आहेत. त्यावेळी त्याची सरासरी ३१.५७ होती, तर स्ट्राइक रेट १२५ होता. देवदत्तच्या नावावर आयपीएलच्या दोन वर्षांमध्ये एक शतक आणि ६ अर्धशतक आहेत.

राजस्थान राॅयल्स संघाने विकत घेतल्यावर देवदत्तने सोशल मिडायावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्याने त्याच्या अधिकृत ट्विटर आकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, ‘”मी पुढील हंगामात राजस्थान राॅयल्स परिवाराकडून खेळण्यासाठी उत्सुक आहे. मी फ्रॅंचायझी आणि व्यवस्थापकांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. मी कुमार संगकारा, जाॅस बटलर, संजू सॅमसन या खेळाडूंसोबत खेळण्यास तयार आहे. या सर्वांनी आपल्या कारकिर्दीत खुप काही मिळवले आहे. मी यांच्यासोबत मिळुन माझ्या खेळात सुद्धा सुधारणा करू शकतो. आशा करतो की आमचा पुढचा हंगाम चांगला होईल.”

राजस्थान राॅयल्स संघात पहिल्यांदा युवा खेळाडू यशस्वी जायसवाल सुद्धा सहभागी होता, परंतु या हंगामात फ्रॅंचाझीने त्याला संघात कायम ठेवलेले नाही. पडीकलने २०२० च्या आयपीएल हंगामात १५ सामन्यांध्ये ५ अर्धशतकांसह ४७३ धावा केल्या होत्या. तसेच २०२१ च्या १४ व्या हंगामात देवदत्तने १४ सामन्यांत तब्बल ४११ धावा केल्या आहेत. आता देवदत्त राजस्थान संघाकडून कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL Auction| आरसीबीकडून लिलावात विराटच्या मित्राला ‘टाटा’, पण राजस्थानने साडेसहा कोटी देत दाखवला विश्वास

मोठ्या वादानंतर कृणाल आणि हुडा पुन्हा खेळणार एकाच संघात ! सोशलमीडियावर उमटल्या अशा प्रतिक्रिया

‘गेले दोन महिने माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस’, श्रेयस अय्यरने मांडली व्यथा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---