---Advertisement---

आधी हातावर लागला जोराचा चेंडू, नंतर स्वस्तात बाद झाला हार्दिक; मग काय पत्नी नताशाचे पडले तोंड

On: गुरूवार, एप्रिल 28, 2022 4:43 PM
Natasha-Reaction-On-Hardik-Video
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२मध्ये नव्याने सहभागी झालेला गुजरात टायटन्स संघ कर्णधार हार्दिक पंड्या याच्या नेतृत्त्वाखाली शानदार प्रदर्शन करत आहे. संघातील इतर खेळाडूंप्रमाणे स्वत कर्णधार पंड्याही जबरदस्त लयीत आहे. परंतु सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या हंगामातील ४०व्या सामन्यात त्याला खास प्रदर्शन करता आले नाही. दरम्यान त्याला चेंडू लागला, ज्यामुळे त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिक चिंताग्रस्त दिसली. 

हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad vs Gujrat Titans) १९६ धावांच्या आव्हानाच्या पाठलाग करताना गुजरातकडून शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी वेगवान सुरुवात केली. आठव्या षटकात ६९ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर पंड्या (Hardik Pandya) फलंदाजीला आला होता. हैदराबादकडून उमरान मलिक (Umran Malik) हे षटक टाकत होता.

मलिकने पंड्याला पहिलाच चेंडू १४५ किलोमीटर प्रति तास वेगाने टाकला, जो सरळ पंड्याच्या उजव्या खांद्याला (Umran Hits Off Hardik’s Shoulder) जाऊन लागला. त्यानंतर तो खूप अस्वस्थ झाला. पंड्याची पत्नी नताशा (Natasha Stankovic) हा सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये आली होती. आपल्या पतीला चेंडू लागल्याचे पाहून ती खूप चिंतेत पडली होती.

पुढे दहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मलिकने पंड्याला मार्को जेन्सनच्या हातून झेलबाद केले. मलिकचा भेदक चेंडू पंड्याच्या बॅटच्या वरच्या कडेला लागून थर्ड मॅनवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या जेन्सनच्या हातात गेला. हार्दिक बाद झाल्यानंतर त्याची पत्नी नताशाचा ((Natasha Stankovic Reation) चेहरा पडला. कॅमेरात तिची ही प्रतिक्रिया कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पंड्याने आतापर्यंत केलीत ३ अर्धशतके
दरम्यान पंड्याने आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत ७ सामने खेळताना ६१.०० च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. त्याने हे ७ सामने खेळताना ३ अर्धशतकांच्या मदतीने ३०५ धावा केल्या आहेत. तो गुजरातकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

असा झाला सामना
सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने ५ विकेट्स गमावत हैदराबादचे लक्ष्य गाठले आणि सामना खिशात घातला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

सहा चेंडूत ४१६च्या स्ट्राईक रेटने २५ धावा कुटणारा हैदराबादचा पठ्ठ्या, जाणून घ्या त्याच्याबद्दल

बिग ब्रेकिंग! इंग्लंडला मिळाला रुटचा वारसदार; बेन स्टोक्स बनला नवा कसोटी कर्णधार

दिल्लीचा सामना पाहून चिडलेला पाँटिंग, ३-४ रिमोटही तोडले होते, स्वत:च केलाय खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---