---Advertisement---

हार्दिक पंड्या पुन्हा बनणार बाप? पत्नी नताशाच्या ‘या’ फोटोंनी चर्चांना उधाण

Hardik Pandya with Family
---Advertisement---

शनिवारी (२५ डिसेंबर) नाताळ सण जगभरात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त अनेकांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. यात भारतीय क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. पण यादरम्यान हार्दिक पंड्याने एका वेगळ्याच कारणाने लक्ष वेधून घेतले. त्याने नाताळानिमित्त शेअर केलेले कुटुंबासमवेतच्या फोटोंनी हार्दिक पंड्या पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 

हार्दिक पुन्हा होणार बाबा?
झाले असे की, हार्दिकने शनिवारी सोशल मीडियावर कुटुंबातील सदस्यांबरोबरचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंना कॅप्शन देताना त्याने लिहिले होते की, ‘आमच्या छोट्या कुटुंबाकडून नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.’

या फोटोंमध्ये एक फोटो असाही होता, ज्यामध्ये हार्दिकची पार्टनर नताशाचे पोट थोडे वाढलेले दिसत आहे, तसेच गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेल्या नताशाने पोटाला हात लावला आहे. यावरून अनेकांनी असा कयास लावला आहे की, नताशा बेबी बंप फ्लॉंट करत आहे. त्यामुळे नताशा प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली असून अनेक चाहत्यांनी हार्दिकला दुसऱ्यांदा बाबा होणार म्हणून शुभेच्छाही दिल्या आहेत. 

https://www.instagram.com/p/CX6HygdsLdJ/

हार्दिक गेल्या वर्षी झालेला बाबा
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांनी २०२० साली लग्नगाठ बांधली असल्याचे म्हटले जाते. मात्र, त्यांनी लग्न कुठे आणि कधी केले, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र १ जानेवारी २०२० रोजी या दोघांनी साखरपूडा केला होता.

त्यानंतर ३० जुलै २०२० रोजी नताशाने एका गोंडल मुलाला जन्म दिला. हार्दिक आणि नताशाने त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवले आहे. पण आता दीड वर्षाचा झालेल्या अगस्त्यला येत्या काही दिवसात भाऊ किंवा बहिण मिळण्याची चर्चा जोरदार रंगली आहे.

अधिक वाचा – ‘आठवणींना संपूर्ण आयुष्यभर माझ्यासोबत ठेवीन’, मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हार्दिक पंड्या भावुक; पाहा व्हिडिओ

सध्या भारतीय संघातून हार्दिक बाहेर
सध्या हार्दिक पंड्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील खराब टप्प्यातून जात आहे. दोन वर्षांपूर्वी पाठीवर केलेल्या शस्त्रक्रियेनंतर हार्दिकच्या गोलंदाजीवर बंधन आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याला कसोटी संघात जागा मिळताना दिसत नाहीये. त्याचबरोबर फलंदाजीतही तो गेल्या काही सामन्यांमध्ये पुरेसे योगदान देऊ शकलेला नाही. त्यातच त्याला सातत्याने दुखापतीचा सामना करावा लागत आहे. परिणामी सध्या तो भारतीय संघातून बाहेर आहे.

व्हिडिओ पाहा – त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट

हार्दिकने आत्तापर्यंत ११ कसोटी, ६३ वनडे आणि ५४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ५३२ धावा आणि १७ विकेट्स घेतल्यात. त्याचबरोबर वनडेत त्याने १२८६ धावा केल्या असून ५७ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये हार्दिकने ५५३ धावा आणि ४२ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘भारत अव्वल क्रमांकाचा संघ, पण आम्ही…’, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेच्या कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिकेत ‘रो’ ‘हिट’ होण्यासाठी सज्ज, पूर्ण केली फिटनेस चाचणी; खेळणार वनडे मालिका!

आशिया चषकात नव्या ‘मलिंगा’चा कहर! फलंदाजांना दिवसा दाखवलं चांदणं, व्हिडिओ सर्वत्र व्हायरल

त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट| Virat's First Century And Gambhir's Gift

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---