---Advertisement---

‘भारत अव्वल क्रमांकाचा संघ, पण आम्ही…’, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी दक्षिण अफ्रिकेच्या कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया

Dean Elgar
---Advertisement---

दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला (South Africa tour of India) २६ डिसेंबरपासून त्यांचा पहिला कसोटी सामना खेळायचा आहे. भारतीय संघाचे मागच्या काही काळापासून विदेशातील प्रदर्शन पाहता ते अप्रतिम राहिले आहे, परंतु, संघाला दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर अद्याप एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. अशात आगामी कसोटी मालिकेत भारत दक्षिण अफ्रिकेतील पहिला विजय मिळवू इच्छित आहे. अशात दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) याने कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

डीन एल्गरच्या मते आगामी कसोटी मालिका दक्षिण अफ्रिकेत खेळली जात आहे आणि मायदेशातील परिस्थितीत त्यांच्या संघाचे पारडे भारतापेक्षा जड असणार आहे. तो म्हणाला, “हा बराचसा तुल्यबळ सामना आहे. आम्ही मायदेशीत खेळत आहोत, त्यामुळे आमचे पारडे थोडे जड राहील. त्यांचा (भारत) संघ जगात अव्वल क्रमांकाचा आहे. आम्ही याला अशाप्रकारे पाहू शकत नाही. एका क्रिकेटप्रेमीच्या रूपात मला असे वाटते की, त्यांचा संघ मागच्या काही काळापासून चांगले प्रदर्शन करत आहे.”

“त्यांनी अलिकडच्या काळात जे काही केले, तुम्ही त्याचे श्रेय त्यांच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही. त्यामुळे मी येथे हे म्हणायाला आलो नाही की, त्यांचा संघ जगात सर्वश्रेष्ठ नाहीय, कारण क्रमवारी देखील महत्वाची आहे. परंतु, हे चित्र देखील नाकारले जाऊ शकत नाही की, आम्ही आमच्या घरच्या मैदानावर खेळत आहोत, ज्यामुळे मालिकेत उतरण्याआधीच आम्ही भक्कम स्थितीत आहोत,” असे एल्गर म्हणाला.

अधिक वाचा – पुन्हा वाद उफाळू नये म्हणून ‘बॉक्सिंग डे’ कसोटीपूर्वीच्या पत्रकार परिषदेत सहभागी होणार नाही कर्णधार विराट?

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. याविषयी एल्गर म्हणाला, “यावेळी त्यांची (भारताची) गोलंदाजी भक्कम बाजू आहे. आम्हाला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. एका गोलंदाजी आक्रमणाच्या रूपात त्यांनी खूप यश मिळवले आहे. त्यांच्याकडे खूप अनुभवी गोलंदाज आहेत. सामने दक्षिण अफ्रिकेत असल्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की, त्यांचे गोलंदाजी आक्रमण परिस्थितीचा योग्यप्रकारे फायदा घेईल.”

भारताने दक्षिण अफ्रिकेत अजून एकही कसोटी मालिका जिंकली नाहीय. पण दुसरीकडे यावर्षीच्या सुरुवातील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने कसोटी मालिका जिंकली होती. तसेच इंग्लंड दौऱ्यातही भारताने आघाडी घेतली होती, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकेतील शेवटचा सामना स्थगित करण्यात आला होता. एल्गरने भारताच्या या प्रदर्शनाची देखील दखल घेतली आहे.

“आम्हाला याची (भारताच्या विदेशातील प्रदर्शनाची) चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांनी विदेशातील त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये खूप सुधारणा केली आहे,” असे एल्गर पुढे म्हणाला.

महत्वाच्या बातम्या –

दक्षिण आफ्रिकेत ‘रो’ ‘हिट’ होण्यासाठी सज्ज, पूर्ण केली फिटनेस चाचणी; खेळणार वनडे मालिका!

सेंच्यूरियनच्या मैदानावर द. आफ्रिकेने गमावल्यात फक्त २ कसोटी, पण भारताचं अजूनही नाही उघडलं खातं

व्हिडिओ पाहा –

बॉक्सिंग डेचा अर्थ, त्याचा इतिहास आणि बरचं काही... | What is Boxing Day Test? History of Boxing Day

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---