वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू कायरन पोलार्ड याने बुधवारी (२० एप्रिल) मोठा निर्णय घेतला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली (Kieron Pollard Retired) आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटद्वारे त्याने याबद्दल माहिती दिली आहे. त्याच्या या तडकाफडकी निर्णयामुळे क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे.
पोलार्ड (Kieron Pollard) हा वनडे आणि टी२० क्रिकेटमधील महान अष्टपैलूंपैकी एक आहे. त्याने मर्यादित षटकांच्या या क्रिकेट स्वरूपात उमदा प्रदर्शन केले आहे. त्यातही त्याने श्रीलंकेविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये एका षटकात मारलेले सलग ६ षटकार (6 Sixes In An Over) कोणताही चाहता विसरू शकणार नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जेव्हा पोलार्डने ६ चेंडूत मारले होते ६ षटकार
पोलार्डने मार्च २०२१ मध्ये हा पराक्रम केला होता. श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज (Sri Lanka vs West Indies) यांच्यात रंगलेल्या सामन्यात पोलार्डने अकिला धनंजयला एका षटकात सलग ६ षटकार मारले होते. यासह तो हर्षल गिब्ज आणि युवराज सिंगनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ चेंडूत सलग ६ षटकार मारणारा तिसराच फलंदाज ठरला होता. तसेच वेस्ट इंडिजकडून हा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज होता.
टी२० क्रिकेटमध्ये मारलेत भरपूर षटकार
याखेरीज ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाराही पोलार्ड दुसराच फलंदाज आहे. त्याने ५८७ ट्वेंटी ट्वेंटी सामने खेळताना ७७० षटकार ठोकले आहेत. त्याचा संघ सहकारी आणि वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याबाबतीत अव्वलस्थानी आहे. त्याने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०५६ षटकार मारले आहेत.
The best moment in Kieron Pollard's International career – 6 sixes in a single over. Thank you, @KieronPollard55. pic.twitter.com/Zuga8dUJzJ
— Johns. (@CricCrazyJohns) April 20, 2022
पोलार्डची आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्द
पोलार्डच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने १०१ सामने खेळताना २५.३१च्या सरासरीने १५६९ धावांचा पाऊस पाडलाय. या धावा करताना त्याने ६ अर्धशतकेही झळकावली आहेत. टी२०त गोलंदाजी करताना त्याने ८.३३च्या इकॉनॉमी रेटने ४२ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
पोलार्डची आयपीएल कारकिर्द
पोलार्ड सध्या आयपीएलच्या १५व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसत आहे. त्याच्या आयपीएल कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत १८४ सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने २९.३९च्या सरासरीने ३३५० धावा केल्या आहेत. यामध्ये १६ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, गोलंदाजीत त्याने ८.८२च्या इकॉनॉमी रेटने ६६ विकेट्सही घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! चेन्नई संघात नव्या भिडूची एन्ट्री, ‘हा’ १९ वर्षीय खेळाडू घेणार ऍडम मिल्नेची जागा
IPL2022| चेन्नई वि. मुंबई सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!