मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा हंगाम विसरण्याजोगा राहिला. त्यांना या हंगामात विशेष प्रदर्शन करता आले नाही आणि त्यांच्या स्पर्धेतून सर्वात आधी बाहेर होण्याची नामुष्की ओढावली. परंतु या हंगामात मुंबई संघाला काही असे खेळाडू मिळाले, ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे भविष्य म्हटले जात आहे. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे, ट्रिस्टन स्टब्स. दक्षिण आफ्रिकेचा हा आता चर्चेत आला असून यामागचे कारण त्याची द हंड्रेड स्पर्धेतील विस्फोटक फलंदाजी आहे.
द हंड्रेड (The Hundred) स्पर्धा २०२२ मध्ये ट्रिस्टनने (Tristan Stubbs) अनुभवी वेगवान गोलंदाज तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi) याच्याविरोधात सलग ४ चेंडूंवर ४ खणखणीत षटकार (Consecutive 4 Six) ठोकले आहेत.
मँचेस्टर ओरिजिनल्स संघाचे प्रतिनिधित्त्व करताना ट्रेंट रॉकेट्स संघाविरुद्ध ट्रिस्टनचे रौद्ररूप पाहायला मिळाले. जोस बटलर आणि फिलिप साल्ट यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिल्यानंतर त्याने संघाला आक्रमक शेवट करून देण्याचे काम केले. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १० चेंडूत २७ धावांची छोटेखानी पण प्रभावी खेळी केली. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी गोलंदाज शम्सी याला त्याने चांगलाच चोप दिला.
https://twitter.com/Lil_Boies45/status/1558466062861336582?s=20&t=MSzI19kEONQ2dXRwKLQIgw
ट्रिस्टनने शम्सीच्या डावातील ७६ व्या चेंडूवर डीप मिडविकेटला खणखणीत षटकार मारला. यानंतर पुढील चेंडूवर त्याने लाँग ऑनवरून पुन्हा एक षटकार खेचला. आपल्या षटकारांची ही लय चालूच ठेवत त्याने तिसऱ्या चेंडूवरही षटकार ठोकत षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली. इतक्यावरच तो थांबला नाही तर, त्याने चायनामन गोलंदाज शम्सीच्या पुढील सलग चौथ्या चेंडूलाही सीमारेषेबाहेर पाठवले. शम्सीने सलग ३ षटकार खाल्ल्यानंतर चौथा चेंडू गुगली टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू फुल टॉस झाला, ज्यावर ट्रिस्टनने आणखी एक नेत्रदिपक षटकार टोलवला. द हंड्रेडच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ट्रिस्टनच्या षटकारांचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत.
असे असले तरीही, ८०व्या चेंडूवर ट्रिस्टन शम्सीच्या गोलंदाजीवरच बाद झाला. शम्सीने ऍलेक्स हेल्सच्या हातून ट्रिस्टनला बाद केले.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Best Catch | ‘या’ खेळाडूने घेतला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेल, पाहा व्हिडिओ
ऑस्ट्रेलियाच्या ऍलानाची ‘किंग’ कामगिरी, ‘द हंड्रेड’मध्ये हॅट्रिक घेत विश्वविक्रम केला नावावर
अखेर चाहत्यांच्या मागणीला यश! लिजेंड्स लीगमधून गिब्सचा काढता पाय; हा ऑसी दिग्गज घेणार जागा