भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर २ सामन्यांच्या कसोटीतील दुसरा सामना (Second Test) सुरू आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरूपात (Day-Night Test) खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीत संघर्ष करताना दिसला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला केवळ २५२ धावा करत्या आल्या. भारताकडून केवळ श्रेयस अय्यर एकटाच अर्धशतक करू लागला. इतर फलंदाजांबरोबरच शतकाच्या प्रतिक्षेत असलेल्या भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) हादेखील या सामन्यात सपशेल फेल (Virat Kohli Fail) ठरला.
बंगळुरूचे मैदान हा विराटचा प्लस पाँईट समजला जात होता. त्यामुळे मोहालीतील शंभराव्या कसोटी सामन्यात अपुऱ्या राहिलेल्या शतकाची प्रतिक्षा तो या सामन्यात तरी संपवेल, असे वाटत होते. परंतु पुन्हा एकदा विराटने त्याच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग केला. मयंक अगरवाल (४ धावा) आणि रोहित शर्मा (१५ धावा) स्वस्तात बाद झाल्यानंतर विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने हनुमा विहारीसोबत मिळून चांगली सुरुवातही केली होती.
परंतु ४८ चेंडूंचा सामना केल्यानंतर २३ धावांवर खेळत (Virat Kohli Out On 23) असताना विराटचा अंदाज चुकला आणि तो पायचीत झाला. धनंजय डी सिल्वाचा डावातील २८ व्या षटकातील तिसरा चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर उसळी न घेता फिरकी घेत आला आणि यावर विराट गोंधळून दिला. परिणामी डि सिल्वाचा चेंडू विराटच्या पॅडवर जाऊन आदळला आणि पंचांनी त्याला पायचीत दिले.
अशाप्रकारे साध्या ३० धावाही न करता विराटने त्याची विकेट गमावली. मागील मोहाली कसोटीत त्याचे अर्धशतक ५ धावांनी हुकले होते. तो या सामन्यात ४५ धावांवर बाद झाला होता.
https://twitter.com/rishobpuant/status/1502592854765432836?s=20&t=xa651NdM4TMBSSMnfiPvyg
विराटच्या ७१ व्या शतकाची प्रतिक्षा संपता संपेना
विराटला गेल्या ३ वर्षांपासून एकही आंतरराष्ट्रीय शतक करता आलेले नाही. त्याने २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटीत शेवटचे शतक केले होते. त्यानंतर त्याला अद्याप वनडे, टी२० आणि कसोटीत एकही शतक करता आलेले नाही. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल २४ वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मारला ‘या’ पदार्थावर ताव
विश्वचषकात हरमनप्रीत कौर ठरली ‘सिक्सर क्वीन’ ‘इतके’ षटकार ठोकत गाठला पहिला क्रमांक
पंजाबकडून पुणे विद्यापीठाला पराभवाचा धक्का; लव्हली विद्यापीठाकडून मुंबई विद्यापीठ पराभूत