---Advertisement---

विराटच्या 79 शतकांचं सेलिब्रेशन पाहा एका मिनिटात । VIDEO

Virat Kohli 79 century celebration in one minute.
---Advertisement---

विराट कोहली याने वनडे विश्वचषक स्पर्धेतील दुसरे शतक रविवारी (5 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध जिंकले. भाराटचे शतक आणि रविंद्र जडेजा याच्या फिरकी गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिका संघ टिकी शकला नाही. भारताने हा सामना 243 धावांनी जिंकला गुणातलिकेती आपला पहिला क्रमांक अधिक भक्कम केला. वनडे क्रिकेटमध्ये हे 49वे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 79वे शतक ठरले. चाह आता विराट कोहलीच्या या सर्वच्या सर्व शतकांचे सेलिब्रेशन एकाच व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

भारत आणि दक्षिण (India vs South Africa) यांच्यातील हा सामना रविवारी (5 नोव्हेंबर) कोलकाता स्थित ईडन गार्डन्स स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. विराट कोहली (Virat Kohli) याने 121 चेंडूत 101 धावा केल्या. तर श्रेयस अय्यर यानेही 87 चेंडूत 77 धावांची खेळी केली. यात कर्णधार रोहित शर्मा याच्या 40, तर फिनिशर म्हणून भूमिका पार पाडणाऱ्या रविंद्र जडेजा याच्या 29* धावांचे योगदान महत्वाचे ठरले. भारतीय संघासाठी या सामन्यात गोलंदाजांचे प्रदर्शन देखील अप्रतिम राहिले. रविंद्र जडेजा याने 9 षटकात 33 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली, तर मोहम्मद सिराज याने एक विकेट घेतली.

भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल बाद झाल्यानंतर विराट आणि श्रेयस अय्यर खेळपट्टीवर टिकून राहिले. अय्यरने देखील शतक करण्याआधी विकेट गमावली. पण विराटने संयमी खेळ दाखवत वनडे कारकिर्दीतील 49 वे शतक ठोकले. सचिन तेंडुलकर याच्या 49 वनडे शतकांची त्याने बरोबरी केली. सोशल मीडियावर विराटचा एक विहिओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओत विराटच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकापासून 79व्या शतकापर्यंत प्रत्येक वेळी त्याने केलेले सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे.

दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ अवघ्या 83 धावांवर सर्वबाद झाला. मार्को यान्सेन याने 14 धावांची सर्वोत्तम खेळी केली. क्विंटन डी कॉक विश्वचषकात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे, पण भारताविरुद्ध त्यानेही अवघ्या 5 धावा करून विकेट गमावली. कर्णधार टेंबा बावुमा 11, रासी वॅन डर ड्युसेन 13, तर ऍडेन मार्करम 9 धावा करून बाद झाला. हेनरिक क्लासेन अवघी 1 धाव करून बाद झाला, तर फिनिशर डेव्हिड मिलरला 11 धावांवर समाधान मानावे लागले. शेवटच्या चार फलंदाजांमधून एकही दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही. तत्पूर्वी गोलंदाजी विभागात दक्षिण आफ्रिकेसाठी लुंगी एन्गिडी, मार्को यान्सेन, कागिसो रबाडा, केशव महाराज आणि तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

महत्वाच्या बातम्या – 
सेमीफायनलमधून बाहेर पडलेल्या बांगलादेशने दिल्लीत जिंकला टॉस, लंकेने केले 2 तगडे बदल; पाहा Playing XI 
‘भारत विरुद्ध आख्खं जग…’, दक्षिण आफ्रिकेच्या नांग्या ठेचल्यानंतर पाकिस्तानातून आली मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---