---Advertisement---

गोल करताना रुनी जखमी, नाकाला पडले ५ टाके

On: सोमवार, जुलै 30, 2018 3:19 PM
---Advertisement---

अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर सॉकर लीग स्पर्धेत वेन रूनी याने डी सी युनायटेडसाठी त्याचा पहिला गोल केला. तसेच हा गोल करताना त्याच्या नाकाला जखम झाल्याने पाच टाके लागले, हे त्याने ट्विटरवरून सांगितले.

या ट्विटमध्ये रूनी म्हणाला, “हा गोल करून मला खूप आनंद होत आहे. तसेच संघासाठी तीन गुण मिळवले हे पण महत्त्वाचे आहे. हा गोल करताना नाकाला जखम झाल्याने पाच टाकेही पडले.”

या सामन्यात डी सी युनायटेडने कोलोरॅडोला 2-1ने पराभूत केले.

युनायटेडचे प्रशिक्षक बेन ओल्सन म्हणाले, “सामना खेळताना रूनीला जखम होणे ही काही पहिलीच वेळ असेल असे मला नाही. तो एक तंदुरूस्त खेळाडू असून यामधून तो लवकरच बरा होईल.”

रूनीने 33व्या मिनिटाला हा गोल केल्याने संघ पहिल्या सत्रात 1-0 असा आघाडीवर होता. तर दुसऱ्या सत्रात कोलोरॅडोच्या केलीन अॅकोस्टा याने 82व्या मिनिटाला गोल केल्याने सामना बरोबरीत आला.

मात्र युनायटेडच्या उल्सेस सेग्युराला चकवताना निकी जॅक्सनने सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला स्वंय गोल केल्याने युनायटेड संघ या स्पर्धेतील सलग दोन सामन्यांच्या पराभवानंतर जिंकला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

टाॅप ५- इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय खेळाडू

ब्रिटिश जनतेला लवकरच कळेल, कोहली काय चीज आहे!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment