यंदाच्या महिला बिगबॅश लीग मध्ये मोठ्या-मोठ्या भारतीय खेळाडूंचा जलवा पाहायला मिळणार आहे. खर तरं बिग बॅश लिगच्या ड्राफ्ट मध्ये भारतीय संघाच्या 19 खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये खेळल्या जाणाऱ्या या टी20 लिगमध्ये टीम इंडियाच्या एकूण 19 प्रतिभाशाली खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत काैर, जेमिमा रॉड्रिग्ज, दिप्ती शर्मा, श्रेयांका पाटील, तितास साधू, आशा शोभना, सजना सजीवन, मन्नत कश्याप मेघना सब्बिनेनी, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम आणि मेघना सिंग यांचा समावेश आहे.
याआधी ऑस्ट्रेलियाच्या टी20 लिगमध्ये हरमनप्रीत काैर शिवाय जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मंधाना, दिप्ती शर्मा आणि राधा यादव यांसारख्या खेळाडूंनी बीग बॅश लिग मध्ये खेळल्या आहेत. परंतु यावेळी भारतीय खेळाडूंची संख्या वाढणार आहे. वास्तविक, यंदाचा हा सीझन बिग बॅशचा 10 वा हंगाम आहे. याआधी या लीगचे 9 हंगाम खेळले गेले आहेत.
डब्ल्यूबीबीएलमध्ये हरमनप्रीत काैर सिडनी थंडर्स आणि मेलबर्न रेनगेज संघाकडून खेळली आहे. तर स्मृती मंधाना ब्रिस्बेन हीट, होबार्ट हॅरिकेन्स आणि सिडनी थंडर्स संघाकडून प्रतिनिधित्तव केली आहे. तसेच भारतीय संघाची फिरकीपटू राधा यादव डब्ल्यूबीबीएलमध्ये सिडनी थंडर्स संघाचा हिस्सा राहिली आहे. भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज जेमीमा रॉड्रिग्ज मेलबर्न रेनगेज्स आणि मेलबर्न स्टार्स संघाचे प्रतिनिधित्तव केली आहे.
हरमनप्रीत काैर, जेमिमा राॅड्रगिज, दिप्ती शर्मा, श्रेयांका पाटील, तितास साधू, आशा शोभना, सजना सजीवन, मन्नत कश्याप मेघना सब्बिनेनी, वेदा कृष्णमूर्ती, मोना मेश्राम आणि मेघना सिंग या भारतीय खेळाडूंचा डब्ल्यूबीबीएलच्या ड्राफ्टमध्ये समावेश असणार आहे.
हेही वाचा-
कॅरेबियन संघाचा आफ्रिकेला दे धक्का! टी20 मालिकेत क्लीन स्वीप
हत्या प्रकरणातील आरोपी ‘शाकिब अल हसन’ची कारकीर्द संपणार का? बोर्डाकडून मोठी अपडेट
महिला, अपंग आणि कसोटी क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल! ICC अध्यक्ष जय शहांची पहिली प्रतिक्रिया