ऑस्ट्रेलियाच्या टी२० लीग, महिला बिग बॅश लीगमध्ये भारताकडून आणखी एका खेळाडूला करारबद्ध करण्यात आले आहे. भारतीय महिला संघाची अष्टपैलू पूजा वस्त्राकार हिचे नाव बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) खेळणाऱ्या भारतीयांच्या यादीत जोडले गेले आहे. तिच्याशी बीबीएलमधील ब्रिसबेन हिट फ्रँचायझीने करार केला आहे. पूजा वेगवान गोलंदाज असून तिच्याच दमदार फलंदाजी करण्याचीही क्षमता आहे.
पूजाने (Pooja Vastrakar) ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिच्या शानदार प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधले होते. यानंतर न्यूझीलंडमध्ये आयोजित वनडे विश्वचषकातही तिचे प्रदर्शन कौतुकास्पद राहिले होते. याच कारणास्तव तिला महिला बीबीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. पूजापुर्वी पूनम यादव ब्रिसबेन हिट संघाकडून खेळली आहे. तसेच भारताची धाकड सलामीवीर स्म्रीती मंधाना हीदेखील ब्रिसबेन हिट (Brisbane Heat) संघाकडून खेळली आहे.
महिला बीबीएलमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला आहे. मागील हंगामात हरमनप्रीत कौरने दमदार प्रदर्शन केले होते आणि ती प्लेअर ऑफ द टूर्नामेंट बनली होती.
An exciting and powerful young-gun! Welcome Indian International, @Vastrakarp25 🇮🇳
Details: https://t.co/okuatXssYO#BringtheHEAT #WBBL08 pic.twitter.com/wORIc3O2or
— Brisbane Heat (@HeatBBL) July 28, 2022
ब्रिसबेन हिटच्या प्रशिक्षकांनी केले कौतुक
ब्रिसबेन हिट संघाचे प्रशिक्षक एशले नोफ्के यांनी पूजाला करारबद्ध केल्याने आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “पूजा एक शानदार ऍथलिट आहे. ती गतीने गोलंदाजी करू शकते, बॅटने मोठमोठ्या बाउंड्री मारू शकते आणि क्षेत्ररक्षणातही ती खूप चपळ आहे. महिला बीबीएलमध्ये तिचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही तिला आमचा अनुभव प्रदान करण्यासाठी उत्साहित आहोत. ती निश्चितपणे भारताचे भविष्य आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, या ब्रिसबेन हिट संघासाठी चांगले प्रदर्शन करेल.”
पूजा बर्मिंघममध्ये २९ जुलैपासून सुरू होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये सहभागी भारतीय संघाचा भाग आहे. परंतु बर्मिघमला जाण्यापूर्वी तिला कोरोनाची लागण झाली होती. याचमुळे ती अजूनही भारतात असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
CWG 2022: बर्मिंघममधून भारतीय क्रीडाप्रेमींसाठी चिंतेची बातमी; पदकाची दावेदार कोरोनाबाधित?