---Advertisement---

…म्हणून सेहवाग म्हणतो सचिन तेंडूलकरने थकवले!!!

On: बुधवार, मार्च 11, 2020 3:07 PM
---Advertisement---

मंगळवारी (10 मार्च) रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या दुसर्‍या सामन्यात भारतीय लिजंड्स संघानी श्रीलंका लिजंड्सचा पराभव केला. या सामन्यात ‘दव फॅक्टर’ मुळे नाणेफेक महत्त्वाची होती. भारताचा लिजंड्स संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकरने नाणेफेक जिंकून याच परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय योग्य ठरला कारण भारताच्या दिग्गजांनी पाच गडी राखून विजय मिळविला. मात्र वीरेंद्र सेहवागने कर्णधाराच्या निर्णयावर गमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त केली. अधिकृत प्रसारकांशी बोलताना सेहवागने सांगितले की, “या वयात क्षेत्ररक्षण करत असताना आधीच दमायला होतं आणि त्यात सचिनने प्रथम गोलंदाजीची निवड करून आम्हाला २० षटकांचे क्षेत्ररक्षण करण्यास भाग पाडले. फलंदाजीच्या आधीच आम्ही थकून गेलो.”

श्रीलंका लिजंड्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 138 धावा केल्या आणि भारताला 139 धावांचे आव्हान दिले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर तसेच युवराजसिंग केवळ 19 धावांमध्ये माघारी परतले.  त्यामुळे पाठलाग करणे कठीण होत होते. पण इरफान पठाणने किल्ला लढवला. 

पठाणने मनप्रीतसिंग गोनीसह परवेझ महारूफने टाकलेल्या 16 व्या षटकात 26 धावा काढून सामन्याचे चित्र पालटले आणि सामना भारताच्या बाजूने झुकवला. इरफान पठाणने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करताना रोमेश कालुवितरणाची महत्त्वपूर्ण विकेट घेतली आणि धावांचा पाठलाग करताना त्याने केवळ 31 चेंडूंत 57 धावा फटकावल्या.

तत्पूर्वी, मुनाफ पटेलने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत तो भारतीय संघातील एक महत्त्वाचा घटक का होता हे दाखवून दिले. त्याने केवळ 19 धावा देऊन 4 विकेट मिळवल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

हार्दिक पंड्या तब्बल ६ महिन्यांनंतर पुनरागमनासाठी सज्ज, पहा व्हिडिओ

चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूंनी अशी साजरी केली धुळवड, पहा व्हिडिओ

आयसीसी महिला विश्वचषक २०२१ चे वेळापत्रक जाहीर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---