मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयाचे श्रेय संघातील गोलंदाजांना दिले आहे. पावरप्लेमध्ये विकेट्स घेणे आणि डेथ ओव्हर्समध्ये विरुद्ध संघाला जास्त धावा न देणे, या गोष्टी आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरल्या, असे त्याने म्हटले आहे.
रविवारी (११ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर मुंबई विरुद्ध दिल्ली संघात आयपीएल २०२०चा २७वा सामना झाला होता. त्या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईने ५ विकेट्स गमावत १९.४ षटकातच दिल्लीचे आव्हान पूर्ण केले. दरम्यान मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर (३३ चेंडू ४२ धावा), शिखर धवन (५२ चेंडू ६९ धावा) अशा धुरंधरांना वेगाने धावा करु दिल्या नाहीत.
सामन्यानंतर बोलताना कृणाल म्हणाला की, “आम्ही एक गोलंदाजी युनिट म्हणून खूप चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे सुरुवातीच्या काही षटकातच आम्हाला यश मिळाले. टी२० क्रिकेटमध्ये जेव्हाही सुरुवातीच्या काही षटकात तुम्हाला विकेट्स मिळतात, तेव्हा विरुद्ध संघावरील दबाव वाढत जातो. याबरोबरच आम्ही डेथ ओव्हर्समध्येही जास्त धावा दिल्या नाहीत.”
“आमच्यासाठी एक गोष्ट खूप फायद्याची ठरत आहे, ती म्हणजे आमच्याकडे १४० किमी वेगाने गोलंदाजी करणारे ३ गोलंदाज आहेत. कोणत्याही संघासाठी अशाप्रकारचे तीन गोलंदाज असणे ही खूप फायद्याची बाब ठरते. कारण असे गोलंदाज वेगाने चेंडू टाकण्याबरोबर स्विंग गोलंदाजीही करु शकतात.”
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात कृणालने ४ षटके गोलंदाजी करताना केवळ २६ धावा दिल्या आणि अय्यर व अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेची विकेट घेतली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२०: मुंबईने दिल्लीवरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर अशी आहे गुणतालिका
मुंबईचा दिल्लीवर ५ विकेट्सने दणदणीत विजय; क्विंटन डी कॉक ठरला विजयाचा शिल्पकार
दिल्लीची गाडी डगमगणार? गोलंदाजांना नडणारा रिषभ पंत ‘इतक्या’ दिवसांसाठी संघाबाहेर
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ