---Advertisement---

‘अशाप्रकारचे शॉट आधुनिक युगातील फलंदाजांकडून…’, ‘स्विच हिट’ला गांगुलीचे समर्थन

On: मंगळवार, डिसेंबर 8, 2020 10:07 PM
---Advertisement---

क्रिकेट विश्वात सध्या ‘स्विच हिट’ हा शॉट चर्चेचा विषय ठरला आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिविलियर्स हे दोघे हा शॉट खेळण्यासाठी माहीर मानले जातात. मात्र, ऑस्ट्रेलियाचे माजी करणार इयान चॅपेल यांनी या शॉटला विरोध दर्शवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, गोलंदाजांसाठी हे योग्य नाही. परंतु आता भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने या शॉटचे समर्थन केले आहे.

शॉट जबरदस्त होता, पण गोलंदाजांच्या दृष्टीने योग्य नव्हता- चॅपेल

नुकत्याच खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया- भारत मालिकेत ग्लेन मॅक्सवेलने या शॉटचा वापर करून भारतीय गोलंदाजांची जोरदार धुलाई केली होती. परंतु चॅपेल यांनी मॅक्सवेलच्या या शॉटबद्दल म्हटले होते की, यावर बंदी घालायला हवी.

या शॉटसाठी फलंदाज आपली स्वाभाविक स्थिती बदलून (उजव्या हाताचा फलंदाज डावखुरा होतो आणि डावखुरा फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज होतो) त्याच्या उलट होतो. चॅपेल यांनी ईएसपीएन क्रिकइंफोमधील आपल्या स्तंभात म्हटले की, “शॉट जबरदस्त होता, पण गोलंदाजांच्या दृष्टीने हा शॉट योग्य नव्हता”.

‘स्विच हिट’ शॉटबद्दल चॅपेल यांनी लिहले की, “क्रिकेट प्रशासकांचे काम आहे की असे नियम बनवावे, ज्यामुळे बॅट आणि चेंडू यांचे योग्य संतुलन असावे. जर नियम आणि खेळाची परिस्थिती कोणत्याही एकाच्या बाजूने असेल आणि दुसर्‍याच्या नसेल, तर यामुळे प्रतिस्पर्ध्याचे नुकसान होते.”

गांगुलीने केले समर्थन

परंतु भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने या शॉटचे समर्थन केले आहे. तो म्हणाला, “हा खेळ कित्येक वर्षांपासून विकसित होत इथपर्यंत पोहोचला आहे आणि अशाप्रकारचे शॉट या विकासाचा भाग आहेत.”

‘अशा प्रकारचे शॉट आधुनिक युगातील फलंदाजांकडून हिरावून घेतले जाऊ शकत नाही,’ असेही तो म्हणाला.

गांगुलीने दिलेल्या माहितीवरून मिड डे मध्ये छापलेल्या लेखामध्ये म्हटले आहे की, “खेळात प्रगती झाली आहे, तर मला नाही वाटत की आपण आधुनिक युगातील फलंदाजांपासून या प्रचलित शॉटला दूर करू शकतो.”

‘वर्षानुवर्षे क्रिकेटच्या अनेक प्रकाराचा विकास झाला आहे. आता फलंदाज पुढे गेले आहेत आणि ते पारंपारिक आणि व्यावहारिक शॉटच्या शैलीतून पुढे गेलेत आणि आधुनिक शैलीतून त्यांना चांगले परिणाम मिळत आहेत. ग्लेन मॅक्सवेलने आणि एबी डिविलियर्स हे आधुनिक युगातील खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत जागतिक क्रिकेटमध्ये खेळल्या जात असलेल्या कोणत्याही शॉटवर निर्बंध लावणे फलंदाजांच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही,’ असेही गांगुलीने पुढे बोलताना म्हटले.

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! बेन स्टोक्सच्या वडिलांचे ब्रेन कॅन्सरने निधन

विराटचा आणखी एक कारनामा! आता केली ही खास कामगिरी

भारत ‘अ’ संघ पराभवापासून थोडक्यात बचावला; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिला सराव सामना अनिर्णीत 

ट्रेंडिंग लेख-

टॉप ३: २०२० मध्ये वनडेत सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय शिलेदार; अव्वलस्थानी ‘हा’ खेळाडू

भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर

आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---