---Advertisement---

“आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच राहिले नाही, आता आम्ही अजून खुलून खेळू शकतो”

On: गुरूवार, सप्टेंबर 30, 2021 8:11 PM
---Advertisement---

आयपीएलच्या २०२१ च्या ४३ व्या सामन्यासाठी बुधवारी (२९ सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान राॅयल्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान राॅयल्सला सात विकेट्स राखून पराभुत केले. सामन्यात प्रथम फलंदाजी करत राजस्थानने २० षटकांमध्ये ९ विकेट्सच्या नुकसानावर १४९ धावा केल्या होत्या. विजयासाठी आरसीबीला १५० धावांची आवश्यकता असून त्यांनी हे लक्ष्य अवघ्या १७.१ षटकात आणि केवळ तीन विकेट्सच्या नुकसानावर गाठले.

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने सामन्यानंतर, आता आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसल्याचे सांगितले आहे.

चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही
आरसीबीविरुद्ध पराभव झाल्यानंतर राजस्थानचा कर्णधार सॅमसन म्हणाला की, ‘आम्हाला चांगली सुरुवात मिळाली, आमच्या सलामीवीरांनी चांगले प्रदर्शन केले, पण आम्हाला त्याचा फायदा घेता आला नाही. मधल्या षटकांमध्ये थोड्या आत्मविश्वासाची गरज आहे. मैदानात आम्ही इच्छाशक्तीसोबत उतरलो होतो. खेळपट्टीमध्ये वेग होता आणि आमच्या फलंदाजांनी त्याच्यावर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी विकेट गमावले.’

गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले
सॅमसन पुढे म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगायचे तर, हा आठवडा आमच्यासाठी खूप कठीण राहिला आहे. आम्ही १५० धावांचे लक्ष्य दिले होते आणि त्यांनी हे सहज गाठले. आम्ही त्यांच्या समोर चांगलेच आव्हान ठेवले होते. हा मजेदार खेळ आहे, यात कधी काय होईल हे कोणाला माहित नसते. आम्ही एका संघाच्या रूपात भिडण्याची गरज होती. गोलंदाजांच्या प्रयत्नांमुळे आनंदी आहे. आम्ही गोलंदाजीमध्ये चांगले प्रदर्शन केले.’

आता आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही
हंगामात राहिलेल्या सामन्यांविषयी सॅमसनला प्रश्न विचारण्यात आला. त्यावार तो म्हणाला, प्रत्यक्षात आता आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच राहिले नाही. अशाप्रकारच्या मनस्थितीत जास्त स्वातंत्र मिळते. आम्ही मैदानवर अजून खुलून खेळू शकू. यावेळी आम्ही आयपीएलच्या गुणतालिकेत रोचक आणि मजेदार गोष्टी होताना पाहिल्या आहेत. आम्हाला अंतिम सामन्यापर्यंत लढत राहायचे आहे आणि विश्वास कायम ठेवणे गरजेचे आहे.

संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान राॅयल्स संघ हंगामात ११ सामने खेळला असून यातील ७ सामन्यात पराभूत झाला आहे. ८ गुणांसह संघ गुणतालीकेत सातव्या स्थानावर आहे. राहिलेल्या तीन सामने जर संघाने मोठ्या फरकाने जिंकले तर, संघाला प्लेऑफमध्ये संधी मिळू शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रेयस अय्यरने गोलंदाजाला दिले चॅलेंज, ‘तो अँटिना दिसतोय का? मी तिथे शॉट खेळणार’, पाहा व्हिडिओ

चक्क एलोन मस्क यांची मॅक्सवेलच्या खेळीवर प्रतिक्रिया? जाणून घ्या पूर्ण प्रकरण

AUSW vs INDW: मंधना शतकाच्या जवळ, ऐतिहासिक कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर थांबला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---