अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क हे जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्याचे बरेच फॉलोअर्स आहेत. सहसा, ते त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल बोलत असतात. खेळ किंवा राजकारणाबद्दल ते क्वचितच ट्विट करतात. आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यानंतर एलोन मस्क यांचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.
मॅक्सवेल अविश्वसनीय होता
बेंगलोरसाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने बुधवारी बेंगलोरच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने या सामन्यात दमदार नाबाद अर्धशतक झळकावले. मॅक्सवेलने आरसीबीसाठी दोन षटके टाकली आणि १७ धावा दिल्या.
त्याचवेळी एलोन मस्क यांनी इतर कोणत्यातरी ट्विटला उत्तर देताना लिहिले, ‘मॅक्सवेल अविश्वसनीय होता.’ मात्र, त्यांनी केवळ ‘मॅक्सवेल’ हे टोपणनाव वापरल्याने अनेकांनी त्यावर विनोद व मीम बनविले. अगदी ऑस्ट्रेलियन पत्रकार क्लो-अमांडा बेली यांनीही नंतर ट्विट करत लिहीले, ‘होय सर. आपण सर्वांनी आत्ताच आरसीबीचा सामना पाहिला आहे.’
इतर भारतीय चाहत्यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली.
https://twitter.com/elonmusk/status/1443268776930119680?s=19
आरसीबीचा शानदार विजय
सलग दोन पराभवानंतर विजयाच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या राजस्थानला या सामन्यात यशस्वी जयस्वाल व एविन लुईस यांनी ७७ धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर त्यांचा एकही फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. लुईसने राजस्थानसाठी सर्वाधिक ५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बेंगलोरसाठी ग्लेन मॅक्सवेल याने सलग दुसरे अर्धशतक झळकावत आना नाबाद ५० धावा केल्या. यष्टीरक्षक एस. भरतने ४४ धावांचे योगदान दिले व संघाला ७ गड्यांनी विजय मिळवून दिला. दोन बळी घेणारा बेंगलोरचा युजवेंद्र चहल सामनावीर ठरला. आणखी एक विजय मिळविण्यास बेंगलोर प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरू शकेल.






